शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

गंगा भाविकांच्या आनंदाला उधाण

By admin | Updated: July 28, 2015 23:49 IST

सर्व कुंडे भरली : सफाईचे काम घेतले हाती

राजापूर : ऐन पावसाळ्यात आगमन झालेली गंगा पूर्ण भरात असून, काशीकुंडासह सर्व कुंडात तुडूंब पाणी साठा आहे. नेहमीप्रमाणेच गोमुखातून मोठ्या वेगाने पाणी खाली पडत आहे. त्यामुळे समस्त भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. एकादशीच्या मुहूर्तावर गंगा प्रकट झाली व समस्त भाविकांनी नेहमीप्रमाणे त्या स्थानावर धाव घेतली.दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगामाई मागील काही वर्षात दरवर्षाने प्रकट झाली आहे. त्यामुळे समस्त भाविक बुचकाळ्यात सापडले आहेत. यापूर्वी ती २०१२ला प्रकट झाली होती व त्यानंतर गतवर्षी २३ जुलै २०१४ला ती पुन्हा प्रकट झाली आणि २६ आॅक्टोबर २०१४ला अंतर्धान पावली होती. सर्वसाधारणपणे तिचा गमन व प्रकट होण्याची वेळ यामध्ये दोन वर्षांहून अधिक कालखंड असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी गंगामाई अवतीर्ण होते. असे यापूर्वी बोलले जात होते. मात्र, सन २०१२ पासून ती दरवर्षी प्रकट होत आहे.सोमवारी आषाढी एकादशी सर्वत्र साहरी होत असतानाच दुपारी १ ते १.३० दरम्यान गंगामाईचे आगमन झाले. गंगाक्षेत्रावरील काशीकुंड या मुख्य कुंडासहीत उर्वरित तेरा कुंडे जलाने तुडुंब भरली आहेत तर काशिकुंडालगत असलेल्या गोमुखातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा झोत खाली कोसळत आहे. गंगा आगमन झाल्याची माहिती उशिराने कळताच गंगापुत्रांसहीत अनेक भाविकांनी गंगाक्षेत्राकडे धाव घेतली आणि सर्वांच्या आनंदाला उधाण आले. मूळ गंगेच्या मुखातूनही चांगला प्रवाह सुरु आहे. नेहमीप्रमाणे पूर्ण भराने गंगामातेचे आगमन झाल्याने मंगळवारी गंगापुत्रांनी गंगाक्षेत्रावरील साफसफाईचे काम हाती घेतले. सध्या नाशिकमध्ये कुंभमेळा सुरु असून शाही स्नानाचा लाभ भाविक घेत आहेत. याच कालखंडात राजापूरची गंगामाई अवतीर्ण झाली आहे.(प्रतिनिधी)तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगामाई ही डिसेंबर ते जून या कालखंडात अनेक वेळा प्रकट झाली आहे व तिचा कालावधी हा नव्वद ते शंभर दिवस असा राहिलाआहे. पावसाळी दिवसात ती सहसा प्रकट होत नाही असे दाखले आजवर प्राप्त असतानाच ाुलै महिन्यात ती प्रकट झाली आहे हा भाविकांना सुखद धक्का आहे.