शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

जठारांचा स्वाभिमान गहाण, दीपक केसरकरांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 3:17 PM

मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी लगावला.

ठळक मुद्देजठारांचा स्वाभिमान गहाण, दीपक केसरकरांची टीका नीतेश राणे यांच्या ट्विटवरील टीकेलाही उत्तर

सावंतवाडी : मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी लगावला. तसेच आमदार नीतेश राणे यांनी टिष्ट्वटरवर राज्य चालते असा गैरसमज करून घेऊ नये, असे सांगत आमदार केसरकर यांनी बैलगाडीला मागे बांधलेल्या कोकरूचे उदाहरण दिले.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेवक बाबू कुडतरकर, प्रकाश बिद्रे, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, महिला तालुका प्रमुख दिपीका दळवी, श्रावणी सावंत आदी उपस्थित होते.केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गमधील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. फक्त नवीन सरकार आल्यावर पूर्ण सरकारच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून तसेच सध्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिले गेले पाहिजे हे पाहून काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय घेतले आहे. जी कामे सुरू आहेत. ती कामे सुरू रहातील पण काही कामे अद्याप सुरू नाहीत.तसेच ज्याच्या निविदा काढल्या पण काम सुरू करण्याचे आदेश झाले नाहीत, अशीच कामे थांबवण्यात आली असून, ती रद्द केली नसून काही दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आहेत. असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. कोकणातील मंदिरांची कामे रद्द केली त्यावर नीतेश राणे यांनी ट््िवट केले होते. त्यावरही केसरकर यांनी जोरदार टीका केली.काही जणांना वाटते की बैलगाडी जी चालली आहे. ती मागे बांधलेल्या कोकरूमुळेच चालते पण तो भ्रम असतो. त्यामुळे कोणाच्या ट्विटमुळे राज्यात निर्णय होत नसल्याचा टोलाही केसरकर यांनी राणे यांना लगावला.यावेळी जठार यांनी केलेल्या टीकेलाही केसरकर यांनी उत्तर दिले.

जठार यांच्यावर बोलणे मला मुळात आवडतच नाही. पण त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकचे नाव पण घेऊ नये, जी भाजप मराठी माणसाचा पक्ष संपवायला निघाली होती. विधानसभा निवडणुकीत ४० ते ४२ अतिरिक्त उमेदवार उभे करून ते निवडून आणायचे असा त्याचा हट्टाहास होता आणि नंतर शिवसेनेला दुय्यम स्थान द्यायचे यामुळे शिवसेनेच्या वाघाला असा निर्णय घ्यावा लागला. मात्र जठार यांनी नितिमत्तेच्या गोष्टी करू नये त्यांनी आपला स्वाभिमान सध्या राणेंच्या पायाशी गहाण ठेवला आहे, असेही केसरकर म्हणाले.सेनेचाच उमेदवारसावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत कोणताही निर्णय घेताना आम्ही महाविकास आघाडीला विश्वासात घेणार आहोत. मात्र, ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने ज्याच्या ताब्यात जी जागा असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाते. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत शिवसेनाच आपला उमेदवार उभा करेल, असेही केसरकर यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठारNitesh Raneनीतेश राणे