शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जानवली घरफोडी प्रकरणी चोरी करणारे नाशिकचे जोडपे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:28 IST

जानवली-रामेश्वरनगर येथे १ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी नाशिक येथील एका जोडप्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलिसांनी अटक करून अधिक तपासासाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजानवली घरफोडीप्रकरण : अनेक चोऱ्यांचा होणार उलगडा स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाईचोरी करणारे जोडपे ताब्यात, जोडप्यासाठी रचला सापळा

कणकवली : जानवली-रामेश्वरनगर येथे १ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी नाशिक येथील एका जोडप्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलिसांनी अटक करून अधिक तपासासाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दिवसाढवळ्या चोरी करणारी जोडगोळी पोलिसांच्या ताब्यात मिळाल्याने आता अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्यास मदत होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पकडण्यात आलेले पती-पत्नी सराईत गुन्हेगार आहेत. दोघांवरही गोवा, सांगली, पुणे, रायगड येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कणकवली तालुक्यातील जानवली-रामेश्वरनगर येथे १ डिसेंबर २०१७ रोजी सुजाता गणपत सावंत यांचे दिवसाढवळ्या घर फोडून घरातील ४ लाख ७० हजार रुपयांचे दागिने व रोख २ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. या कारवाईत मयूर सोपान भुंडे उर्फ अमित (३१, रा. साईलीला अपार्टमेंट, उज्ज्वलनगर, बोरगड, ता. जि. नाशिक, मूळ रायगड) व त्याची पत्नी सोनाली (२७) यांना अटक करण्यात आली आहे.

चोरीच्या तपासासाठी या दोघांनाही स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गने कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस हवालदार सुधीर सावंत, हवालदार आशिष गंगावणे, महिला पोलीस हवालदार वर्षा मोहिते, पोलीस नाईक संतोष सावंत, नाईक कृष्णा केसरकर, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील यांच्या पथकाने केली.जोडप्यासाठी रचला सापळा; आणखी चोऱ्या उघड होणारमयूर सोपान भुंडे व सोनाली भुंडे यांच्यावर सिंधुदुर्ग, पुणे, कऱ्हाड , नाशिक, सांगली, सातारा येथे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यासाठी मयुर व सोनाली हे जोडपे पोलिसांना हवे होते. १ डिसेंबर २०१७ रोजी रामेश्वरनगर येथे दिवसाढवळ्या चोरी केली होती. शेजाऱ्यांनी कुणीतरी पती-पत्नी रामेश्वरनगर येथे सकाळी ११ च्या दरम्याने फिरताना पाहिले होते. तोच धागा पकडून पोलिसांनी या जोडप्याला पकडले आहे.मयूर भुंडे व सोनाली भुंडे यांच्या जबाबातून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. जानवली-रामेश्वरनगर येथे १ महिन्यापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणी या दोघांचा हात आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी. एन. पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा