घरफोडी झाली; पण तक्रार नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:53 AM2018-02-03T00:53:55+5:302018-02-03T00:54:46+5:30

मूल येथील पंचायत समितीच्या मागील भागात राहणाºया एका व्यक्तीचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यानंतर शेजारच्या घरातील दुचाकी पळवून नेली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. मात्र ज्याचे घर चोरट्यांनी फोडले, त्यांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला.

 Burglary; But do not complain, sir! | घरफोडी झाली; पण तक्रार नको रे बाबा !

घरफोडी झाली; पण तक्रार नको रे बाबा !

Next
ठळक मुद्देउलटसूलट चर्चा : १५ दिवसांत सात घरफोड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल येथील पंचायत समितीच्या मागील भागात राहणाºया एका व्यक्तीचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यानंतर शेजारच्या घरातील दुचाकी पळवून नेली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. मात्र ज्याचे घर चोरट्यांनी फोडले, त्यांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या घरातून चोरट्यांनी बँकेचे कागदपत्र चोरल्याची चर्चा शहरात होती.
मूल पंचायत समितीच्या मागील भागात सुरेश साठोणे यांचे घर आहे. गुरुवारी त्यांच्या घरात कुणीही नव्हते. कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सुरेश साठोणे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात चोरट्यांनी शोधाशोध केली. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही न लागल्याने चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर शेजारीच राहणारे दिलीप शहाणे यांच्या मालकीची होन्डा कंपनीची शाईन (क्र. एमएच ३४ एक्स ८५०६) ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. दरम्यान, सुरेश साठोणे यांच्या घराला लागूनच त्यांचा मुलगा राहतो. शुक्रवारी सकाळी घराचे दार उघडलेले दिसल्यामुळे त्याला घरात चोर शिरल्याचे समजले. त्याला बँकेचे एकदोन कागदपत्रांशिवाय काहीही चोरी गेल्याचे दिसले नाही. याबाबत सुरेश साठोणे यांनी पोलिसात तक्रार मात्र दिली नाही. नाहक पोलीस, कोर्टकचेरीचा ससेमिरा नको म्हणून त्यांनी तक्रार दिली नाही की आणखी कुठले कारण होते, याबाबत उलटसुलट चर्चा केली जात होती. मात्र दिलीप शहाणे यांनी आपली दुचाकी चोरून नेल्याची तक्रार मूल पोलीस स्टेशनला दिली. उल्लेखनीय असे की, मागील १५ दिवसात मूल शहरातील याच भागात सात घरफोड्या झाल्या आहेत. यातील एक घर मूलच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचेही आहे, हे विशेष.
मूल पोलिसांनी वाहन मालकाच्या तक्रारीवरून ३७९ भादंवी अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
वारंवार होत असलेल्या या घरफोडींमुळे नागरिकांमध्ये मात्र चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीसही अपयशी ठरले आहेत.

Web Title:  Burglary; But do not complain, sir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.