शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जालना लाठीचार्ज प्रकरण: मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 2, 2023 13:41 IST

दगड मारणारे कोण?

कणकवली : मराठा समाज आंदोलनावर झालेल्या लाठी चार्ज चे समर्थन केले जाणार नाही. कोणी अधिकाऱ्याने  मस्ती केली आले तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार सोडणार नाही. जालना येथील शिवबा संघटनेचे पाटील हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर जेव्हा चुकीच्या पद्धतीने केसेस दाखल केल्या होत्या तेव्हा माजी खासदार निलेश राणे यांनी सहकार्य करून वाचवले होते. पाटील यांचे शांत पद्धतीने आंदोलन चालू होते प्रशासन आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा दगड कोणी मारले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे खास कार्यकर्ते रघुनाथ शिंदे यांचा सहभाग, दगडफेक आणि एसटी बस जाळपोळ प्रकरणी दिसून आला आहे. याचा अर्थ दंगल घडणार अशी आधी भाकिते करायची आणि नंतर त्यांच्याच लोकांनी जाळपोळ करायची. हा एक प्रकारचा नियोजित कट आहे. मराठा बांधवांनी या चुकीच्या लोकांच्या आवाहनाला बळी पडू नये, कायदा हातात घेऊ नये. केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार आहे. कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.दगड मारणारे कोण?कणकवली ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात घुसून दगडफेक केली गेल्याचा आरोप केला. ते म्हणले मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले कोणाला त्रास दिला नाही. मग पोलिसांवर दगड मराठा समाज बांधव मारणार नाही. आमचा समाज शांत आणि संयमी आहे. त्याने मोर्चातून ते दाखवून दिले. तेव्हा दगड मारणार नाही. मात्र ते दगड मारणारे कोण होते हे शोधले जातील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री, गृहमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे योग्य ती माहिती समोर येईल.मराठा समाजाला ठाकरे सेनेने बदनाम केलेमराठा समाजाला आता आणि तेव्हा सुद्धा ठाकरे सेनेने बदनाम केले. मराठा आरक्षणावर बाजू  कोर्टात मांडली नाही आणि या केसची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे आणि आताच्या विरोधकांनी केले होते. अशा लोकांनी मराठा आरक्षणावर बोलूनच नये. संजय राऊत आणि त्याचे नेते काय म्हणून टीका करतात. राऊत ने मुका मोर्चाचे कार्टून पेपरमध्ये छापून मराठा आरक्षण मोर्चाची  बदनामी केली. तर विजय वड्डटीवार  हे मंत्री असताना मराठा आणि इतर समाज यांच्यात वाद करण्याचा प्रयत्न केला. दंगली पेटवल्या कोणी, कोणाला हव्या आहेत. दंगल दंगल कोण बोलत होता. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्या जाळल्या तो शिंदे हा दानवे यांचा कार्यकर्ता आहे.सरकार आपले, अन्याय होणार नाही आता सरकार तुमचेच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत त्यामुळे हे सरकार आपले आहे अन्याय होणार नाही याची खात्री देतो. संभाजी महाराज यांनी दगड कोणी मारले याची चौकशी करावी. समाजाची बदनामी होते. शरद पवार यांनी सुद्धा भेटीत दगड मारणारे हात कोणाचे आहेत हे पाहावे असेही राणे म्हणाले. दरम्यान मी स्वतः जालना येथे जावून आंदोलनाला भेट देणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गjalna-acजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे