बाजारपेठा उघडल्याने सावंतवाडीत शिवसेनेकडुन जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 13:08 IST2021-06-21T13:06:48+5:302021-06-21T13:08:45+5:30
CoronaVIrus Sawantwadi Sindhudurg : तब्बल अडीच महीन्याच्या कालावधी नंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा आज चालू करण्यात आल्यानंतर बाजारपेठात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान याबाबत सकारात्मक निर्णय घेणार्या पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यासाठी येथिल शिवसेनेच्यावतीने शहरातील जयप्रकाश चौकात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

बाजारपेठा उघडल्याने सावंतवाडीत शिवसेनेकडुन जल्लोष
सावंतवाडी : तब्बल अडीच महीन्याच्या कालावधी नंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा आज चालू करण्यात आल्यानंतर बाजारपेठात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान याबाबत सकारात्मक निर्णय घेणार्या पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यासाठी येथिल शिवसेनेच्यावतीने शहरातील जयप्रकाश चौकात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
दरम्यान बाजारपेठा उघडल्या ही चांगली बाब आहे. परंतू व्यापार्यांनी आणि ग्राहकांनी कोरोनाचे आवश्यक नियम पाळावेत आणी व्यावसाय व खरेदी करावी,असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले.
शिवसेना जिल्हा उपसंघटक शब्बीर मणीयार यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिंदाबाद,ह्वबाळासाहेब ठाकरे आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शब्बीर मणीयार,माजी उपसभापती चंद्रकांत कासार,उपशहर प्रमुख विशाल सावंत,युवा सेनेचे पदाधिकारी विशाल सावंत,सतिश नार्वेकर,राजा वाडकर,सुहेब बेग,लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडुन शहरातील नागरीकांना व व्यापार्यांना लाडू वाटून आंनद साजरा करण्यात आला आहे.