शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

आशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला : ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 4:47 PM

एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी सुमारे ३५० आशा वर्कर्सना ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देआशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले

सिंधुदुर्गनगरी : एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी सुमारे ३५० आशा वर्कर्सना ताब्यात घेण्यात आले.आशा व गटप्रवर्तक यांना देण्यात येणारे मानधन हे अत्यल्प आहे. त्यामुळे या मानधनात वाढ करण्यात यावी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करण्यात यावे, आशांना आरोग्य सेवेत कायम करावे, खासगीकरण बंद करावे या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांच्याकडून अनेक वेळा मोर्चा, धरणे, जेलभरो आदी आंदोलने करण्यात आली.या आंदोलनांची दखल घेत आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात तिप्पट वाढ करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.मात्र, त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जात नाही. त्यामुळे मानधन वाढीचा शासन निर्णय निघत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)शी संलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको करीत जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना धुरी, सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांच्यासह ४०० हून अधिक आशा कर्मचारी उपस्थित होत्या.आंदोलकांना समज देऊन सोडलेआपल्या विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी ओरोस फाटा येथे जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी ३५० आशा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याअंतर्गत समज देऊन त्यांना सोडण्यात आले.महामार्गावर वाहनांच्या रांगाआपल्या न्याय मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनने बुधवारी ओरोस फाटा येथे विविध गगनभेदी घोषणा देत रास्ता रोको केला. महामार्गावर आशा कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग