शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 13, 2023 14:15 IST

कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ४५ घरफोडीकरून चोरींमध्ये सहभाग

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात तब्बल ४५ घरफोडी करून चोरी करणार सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास बुधवारी (१२ जुलै) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ताब्यात घेतले आहे. प्रकाश विनायक पाटील (३७ रा. घाटवाडा, पडोसे सत्तरी नॉर्थ गोवा) असे त्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ३० लाख ४८ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह संशयिताला ताब्यात घेणारी टीम उपस्थित होती. यावेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल म्हणाले की, १२ जुलै २०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम कणकवली पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील हा त्याच्याकडील कार नं. जीए- ०५ एफ ४६०१ ने प्रवास करताना मिळून आला.त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीसाठी लागणारे साहित्य, चोरी केलेले पैसे व दागिने आणि हत्यारे आढळून आली. त्यामुळे या संशयित आरोपी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास कणकवली पोलिस ठाण्यामार्फतीने सुरु आहे.तब्बल ४५ गुन्ह्यांची नोंदसंशयित आरोपी प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुध्द सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्हयामध्ये ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४ असे एकूण ४५ गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुन्हयांमध्ये पाहिजे व काही गुन्हयांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषीत आहे.

अग्नीशस्त्र, घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा केला जप्तया संशयित आरोपी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता. याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.

३० लाख ४८ हजार ७८४ चा मुद्देमाल जप्तकणकवली तालुक्यातील वागदे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीकडून १ गावठी कट्ठा, ३ जिवंत राऊंड, १ काडतूस बंदूक, २७ जिवंत काडतूसे, ५ तलवारी, ४ लाख ६९ हजार ९५० रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल हॅन्डसेट, १६६ ग्रॅम १६ मिली वजनाचे ९ लाख ६८ हजार ४९० रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने, ३ लाख ३५ हजार ८४४ रुपये किंमत असलेले ५ किलो ३०० ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने, पैसे मोजण्याची ईलेक्ट्रीक मशिन, सोने चांदी वितळविण्याची इलेक्ट्रीक मशिन, ३ ड्रिल मशिन, एक दुचाकी व एक चार चाकी वाहन असा एकूण ३० लखा ४८ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या पथकाने केली कारवाईही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप भोसले, सहा पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस उप निरीक्षक रामचंद्र शेळके, सहा. पोलिस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, रुपाली खानोलकर, आशिष जामदार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, रवि इंगळे यांनी केलेली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस