शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्‍वे विद्युतीकरण मार्गाची तपासणी सुरू, रेल्वे सुरक्षा आयुक्‍त सिंधुदुर्गात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 12:08 IST

कोकण रेल्‍वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्‍नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले.

कणकवली : कोकण रेल्‍वे मार्गावरील रत्‍नागिरी ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरण मार्गाची तपासणी करण्यासाठी रेल्‍वेचे सुरक्षा आयुक्‍त मनोज अरोरा यांच्या नेतृत्‍वाखाली पथक सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. हे पथक आज कणकवली ते वेर्णा या मार्गाची तपासणी करणार आहेत.कोकण रेल्‍वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्‍नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. सध्या या मार्गावर रत्‍नागिरी ते दिवा ही पॅसेंजर गाडी तसेच रत्‍नागिरीपर्यंत येणाऱ्या मालगाड्या विजेवर धावत आहेत. त्‍यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्‍नागिरी ते गोव्यातील वेर्णा या स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्‍यानंतर आता या विद्युतीकरण कामाची रेल्‍वे सुरक्षा आयुक्‍त मनोज अरोरा यांच्या पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे.रत्‍नागिरी ते नांदगाव या स्थानक दरम्‍यान रेल्‍वे मार्ग, विद्युत यंत्रणा आदींची तपासणी काल करण्यात आली. तर आज कणकवली ते सावंतवाडी या दरम्‍यानच्या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. त्‍यानंतर हे पथक मडुरा ते वेर्णा या मार्गाची तपासणी करणार असल्‍याची माहिती रेल्‍वे सूत्रांकडून देण्यात आली.कोकण रेल्‍वेच्या संपूर्ण ७४० किलोमिटर मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. यातील रोहा ते रत्‍नागिरी, मडगाव ते कारवार, कारवार ते ठोकूर आणि मडगाव ते थीवी या विद्युतीकरण झालेल्‍या मार्गाची रेल्‍वे सुरक्षा आयुक्‍त मनोज अरोरा यांनी यापूर्वीच तपासणी केली आहे. आता रत्‍नागिरी ते वेर्णा या मार्गाची तपासणी पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. तर मार्च पासून कोकण रेल्‍वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावण्याची शक्‍यता आहे. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्याने सध्या डाऊन दिशेला रत्नागिरीपर्यंत माल गाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे.रेल्‍वे सुरक्षा आयुक्‍तांच्या तपासणीनंतर कोकण रेल्‍वेचा संपूर्ण मार्ग डिझेल ऐवजी विद्युत इंजिनावर गाड्या धावण्यासाठी सज्ज होणार आहे. इलेक्ट्रिक इंजिनाची उपलब्धता आणि वीज सबस्टेशनची उर्वरित कामे पूर्ण होईपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक इंजिनासह चालवल्या जाणार आहेत. यात सुरवातीला लांब पल्‍ल्‍याच्या गाड्या विद्युत इंजिनद्वारे चालवल्या जातील व त्या पाठोपाठ इतर गाड्या देखील विजेवर धावू लागतील अशी माहिती रेल्‍वेकडून देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेkonkanकोकणKonkan Railwayकोकण रेल्वे