जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By Admin | Updated: July 10, 2014 00:08 IST2014-07-10T00:05:50+5:302014-07-10T00:08:20+5:30

दोडामार्गमधील पोलीस ठाणे, वसाहतीचा प्रश्न

Inspection by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कसई दोडामार्ग : तालुका पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीसाठी शासकीय जागेची पाहणी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे व तहसीलदार संतोष जाधव यांनी केली. त्यानुसार तिन्ही जागेचे प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात यावेत, असे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले.
पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीसाठी जागा निश्चित करण्यासाठी शासकीय जागा ठरविण्यात आली. वझरे येथे, कोर्टाच्या बाजूची व जुनी पोलीस चौकी या तीन जागा निश्चित केल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी जागेची पाहणी करून सविस्तर चर्चा केली.
यावेळी पोलीस निरीक्षक जे. पी. सूर्यवंशी यांनी जुन्या पोलीस चौकीकडील जागेचा आग्रह धरला. ही जागा शहरात असल्याने सर्वदृष्टीने ही जागा महत्त्वाची असून अन्य जागा शहरापासून दूर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही जागांचे प्रस्ताव तयार करून पाठवून देण्याचे आदेश दिले. तसेच तहसीलदार इमारतीची पाहणी करून आढावा घेतला. (वार्ताहर)

Web Title: Inspection by the Collector