शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

सिंधु महोत्सव ?

By admin | Updated: November 28, 2014 00:08 IST

मालवणी तडका

सकलो : काय झाला? सिंधु महोत्सव काय झालो ?
तुकलो : काय व्होवक नाय अरे सिंधु महोत्सव आता साजरो करु चो हा म्हायती हा मा ?
सकलो : व्हय दरवर्सा करतत मरे
तुकलो : दरवर्सा काय ? कधी तरी हुक्की इली तर बुक्की देतत
सकलो : म्हंजे ?
तुकलो : अरे माका सांग आपलो जिल्हो काय म्हनान घोषीत झालो हा?
सकलो : अरे असा काय म्हनतस आपलो जिल्हो भारतातलो येकमेव पर्यटन जिल्हो म्हनान घोषित झालो हा.
तुकलो : व्हय मा ? मगे माका सांग पर्यटन स्थळांची काय स्थिती हा ? रस्त्यांची काय स्थिती हा?
सकलो : काय काय पर्यटनस्थळार जावक वाटपन नाय हा.
तुकलो : आनी आंबोली सारक्या पॉर्इंटारनी सोय केली तेच्यो फरश्यो आनी लाईट गायब केलेलो हत.
सकलो : अरे तीच तर आपल्या लोकांची खासीयत हा. सरकारचो पैसो म्हंजे कचरो वाटता आमका.
तुकलो : अगदी बरबर. सरकारचो पैसो खर्च झालो तर तेचो कसोव वापर झालो तरी चलता.
सकलो : ही तुजी बाजू बरबर हा. जिसर पैसो खर्च झालो हा. ता पन पर्यटन स्थळ बघण्यासारक्या आसा आनी जिसर खर्चच नाय होवक ता पन बघण्यासारक्याच हा.
तुकलो : अरे जिल्ह्याक आपल्या निसर्गान अगदी खुले आम डोळे उघडे ठेवन भरभरुन दिलला हा. पन आपनाकच ता घेवक जमणा नाय.
सकलो : तांव खराच म्हना. पन तुका सांगतय. बरेच सरकारी योजना हत त्यो राबवताना स्थानिक संस्थांका आनी लोकांका इश्वासात घेवचे आदी राबवतत.
तुकलो : तेचेशिवाय अधिकाऱ्यांका टक्केवारी कशी गावतली.
सकलो : त्या टक्केवारीत आपल्या जिल्ह्याचो विकास रखडलो मरे.
तुकलो : खरा हा. बोर्ड लावचे आसले तरी भायरचो कॅसेटी काढूचे आसले तरी भायरचो.
सकलो : स्थानिकांका काय येना नाय आनी काय कळना नाय असा तेंका वाटत आसता म्हनान ता तसा व्हता.
सकलो : अरे पन मी म्हनतय पर्यटन संस्था हत मा ?
तुकलो : आसत तीस चाळीस पर्यटन संस्था हत मरे पन तेंका कायच म्हायती नसता.
सकलो : तेंका म्हायती दिली तर निधी कसो खर्च पडतलो. आपल्या वाट्याक मगे कायच रवाचा नाय असा तेका वाटतला.
तुकलो : ह्या भानगडीत रौप्यवर्ष साजरा करुचे येळ इलो.
सकलो : म्हंजे?
तुकलो : अरे आपलो जिल्हो पर्यटन जिलो म्हनान जाहीर होऊन आता सतरा वर्सा होऊन गेली पन आजून पायाभूत काय म्हनतत ती सुधारणा अजून व्होवक नाया.
सकलो : अधिकाऱ्यांची झाली ना पायाभूत सुविधा?
तुकलो : ता बघुचा लागात.
सकलो : काय बघुची गरज नाय. पर्यटनासाठी किती निधी इलो आनी कसो खर्च झालो ती म्हायती घेवक व्हयी.
तुकलो : म्हायती घेवन काय करतलस. आता येणारो पैसो कसो खर्च व्हता ता बघुक व्हया.
तुकलो : अगदी बरोबर. आता तरी निदान सतरा वर्सानंतर सिंधु महोत्सव होता. त्यायेळाक सगळ्या पर्यटन संस्थांका इस्वासात घेवन महोत्सवाचा आयोजन करा. असा जिल्हा पर्यटन संस्थेचे अध्यक्ष अतुल हुलेनी जिल्हाधिकाऱ्यांका निवेदन दिला.
सकलो : व्हेरी गुड. आमी पन न्हान मोठे कार्यक्रम घेतव. आमकाव आवड हा, असल्या कार्यक्रमात भाग घेवची.
तुकलो : व्हय मा ? तेचेसाठीच तर तसा निवेदन दिलेला हा. तुझ्या सारकी हौशी मानसा पन हवी हत.
सकलो : आमची कदीव तयारी हा. तुमी फक्त सांगा आमी हजर आसव.
तुकलो : सिंधुमहोत्सव असो व्होवक होयो की आपलो जिल्हो ह्यो पर्यटन जिल्हो हा, ह्या देशाक नको महाराष्ट्राक कळला तरी पुरे हा.
सकलो : किमान आपल्या जिल्ह्यातला सगळ्यांका कळला तरी पुरे हा. त्या धर्मान ते साफसफाई तरी करतीत.
तुकलो : अगदी बरबर. स्थानिक संस्था आनी लोकांका बरोबर घेवन मोठो महोत्सव भरुदे रे म्हाराजा...
- विजय पालकर