शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मजदूर संघांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, जोरदार घोषणांनी कणकवली दुमदुमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:39 IST

कणकवली : कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही' , 'भारतीय मजदूर संघाचा विजय असो अशा घोषणांनी कणकवली शहर सोमवारी दुमदुमून गेले.

कणकवली : कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही' , 'भारतीय मजदूर संघाचा विजय असो अशा घोषणांनी कणकवली शहर सोमवारी दुमदुमून गेले. निमित्त होते ते भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाचे.कणकवली शहरातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील पटकीदेवी मंदिराकडून सुरू झालेला हा मोर्चा बाजारपेठ मार्गे पू. अप्पासाहेब पटवर्धन चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या जिल्हास्तरीय मोर्चात घरेलू कामगार, बांधकाम, एलआयसी, जिल्हा परिषद, बँक, नगरपंचायत, शासकीय रुग्णालये, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले अनेक असंघटीत कामगार सहभागी झाले होते.कणकवली शहरात झालेल्या या मोर्चानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावयाचे निवेदन प्रांताधिकारी निता शिंदे-सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री रवींद्र पुरोहित, कोकण संघटक अनिल ढुमणे, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष भगवान साटम, जिल्हा संघटक सत्यविजय जाधव, सुजित जाधव, जयश्री राणे, अस्मिता तावडे आदींसह शेकडो असंघटीत कामगार सहभागी झाले होते. भर दुपारी रणरणत्या उन्हात मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या धरणे आंदोलनात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.भारतीय घटनेनुसार 'समान काम समान वेतन' कामगारांना मिळालेच पाहिजे. सरकारी उद्योगांमध्ये कंत्राटी पद्धतीच्या कामांचा सपाटा सरकारने लावल्यामुळे कामगार देशोधडीला लागला आहे. त्यामुळे तो असुरक्षित झाला असून किमान वेतन व तत्संबंधी सेवासुविधा कामगारांना मिळाल्या पाहिजेत. केंद्र शासनाच्या नीती आयोगाची भूमिका कामगार विरोधी आहे. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता मिळायला हवी, किमान वेतन कामगारांना मिळावे, कामगार कायद्यातील काही अटी जाचक असून त्यात बदल करण्यात याव्या अशा विविध मागण्यांकडे मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.भारतीय मजदूर संघाशी सलग्न देशभरात सुमारे 2 कोटी 71 लाख कामगार आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढून कामगार आपल्या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधत आहेत. त्याची दखल शासनाने न घेतल्यास 17 नोव्हेंबर रोजी दिल्ली संसद भवनावर देशातील सुमारे 5 लाख कामगार धडकणार आहेत. सिंधुदुर्गातील या मोर्चामधून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले जाणार आहे. आमची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. कामगारांच्या प्रश्‍नांसाठी आता देशपातळीवर लढा उभारला जात आहे, असे मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळे यांनी यावेळी सांगितले.मोर्चात कामगार तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी अडविल्यानंतर कामगारांनी रस्त्यातच ठिय्या मारत धरणे आंदोलन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagitationआंदोलन