शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भैय्या कामगारांच्या गुन्हेगारी उपद्रवाला आळा घाला!, ग्रामस्थांकडून मागणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 30, 2024 18:07 IST

महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना : ग्रामस्थांचे दुर्लक्ष, ग्रामस्थांच्याच अंगलट

सिद्धेश आचरेकरआचरा : तोंडवळी खाडीकिनारी वास्तव्यास असलेल्या भैय्या वाळू कामगारांची गुन्हेगारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोट भरण्याच्या उद्देशाने गावात आलेल्या या परप्रांतीयांच्या काही हरकतींकडे ग्रामस्थांकडून दुर्लक्ष केला गेला. मात्र कामगारांच्या वाढलेल्या मुजोरीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती गावात बोकाळली आहे. त्यामुळे भैय्यांच्या उपद्रवाला लगाम घालण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

तोंडवळी गावात वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांची गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागल्यामुळे महिनाभरापूर्वी ग्रामस्थांनी तातडीने गाव बैठकही घेतली होती. यात धक्कादायक म्हणजे मुक्या प्राण्यांवर अत्याचार करण्याएवढे धाडस कामगारांनी केल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर गाव परिसरात राहणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगार तसेच व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी ठेवताना पोलिस ठाण्यात माहिती देण्यात येईल, अशी भूमिका ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कामगारांची गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. यापुढे परप्रांतीयांची मुजोरी वाढली तर त्याला ग्रामस्थ शासन देतील, अशी भूमिका महिलांची आहे. परप्रांतीय कामगारांची नोंद पोलिस ठाण्यात करणे हे संबंधित व्यावसायिकांची जबाबदारी आहे.

असुरक्षित वाटल्यास डायल ११२ संपर्क साधाकामगारांची गुन्हेगारी वृत्ती वाढली असेल किंवा महिलांना असुरक्षित वाटत असेल तर पोलिस प्रशासनाच्या डायल ११२ या क्रमांकांवर महिलांनी संपर्क साधल्यास पोलिस कर्मचारी त्याची तत्काळ दखल घेत अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी येऊन तपास काम करू शकतील. डायल ११२ ही मोहीम प्रभावी असून पोलिसांकडून यात कोणताही हलगर्जीपणा केला जात नाही.

कामगारांचे ते प्रकार रोखा!वाळू व्यावसायिकांनी कामगारांना योग्य समज देणे आवश्यक बनले आहे. मुक्या प्राण्यांवर अत्याचार होणे ही लाजिरवाणी बाब असून महिला भगिणींनाही आक्षेपार्ह हावभाव करून दाखवल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत, अशीही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. परप्रांतीय कामगारांचे हे प्रकार रोखले न गेल्यास गावकरी स्वस्थ बसणार नाहीत, एवढं मात्र निश्चित.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस