शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ, सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

By सुधीर राणे | Updated: June 13, 2023 11:49 IST

फेरीवाल्या विक्रेत्यांवर संशय

कणकवली : कणकवली तालुक्यातील साळिस्ते, शिडवणे, तळेरे  येथील सात बंद घरे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री फोडली आहेत. त्यामधील तीन घरातील रोख रक्कम व सोने, चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य असा सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. या घरफोडीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तळेरे येथे राहणारे नरहरी रघुनाथ पावसकर यांच्या वहिनीच्या घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. विलासिनी पावसकर या साळीस्ते येथील त्यांचे घर कुलूपबंद करून सुमारे एक महिन्यापूर्वी अंधेरी, मुंबई येथे राहायला गेल्या आहेत.  

तर साळीस्ते येथील सहदेव सावळाराम गुरव व  प्रभावती वासुदेव गुरव, शिडवणे गावातील वसंत कोथंबीरे, प्रकाश शंकर मिसाळ, विजय महादेव टक्के, तर औदुबरनगर येथील सुधीर शशिकांत आरोलकर यांचे राहत्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करुन चोरी करण्यात आली आहे. काही घरात चोरट्यांना काहीच आढळले नाही. शिडवणे कोनेवाडी येथे राहणारे विजय महादेव टक्के यांच्या घरातील ८० हजार रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांचा पुतण्या सुशांत टक्के याने पोलिसांना सांगितले. विजय टक्के यांच्या घरातील ८० हजार रुपये रोख रक्कम , ८६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, कानातील कुडी, मोत्याचा हार,  चांदीचे तांबे असा मुद्देमाल चोरीस गेला. तसेच सुधीर आरोलकर यांच्या घरातील २५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेलेली आहे. या घटनेची माहिती कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

फेरीवाल्या विक्रेत्यांवर संशय !सध्या गावोगाव फेरीवाले विक्रेते विविध वस्तू घेऊन फिरत आहेत.  या चोरिमागे त्यांचाच हात असण्याची शक्यता वर्तवली जात असून इतरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस