शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

Sindhudurg: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सीसीटीव्हीचा वॉच; सावंतवाडीत आंतरराज्य बॉर्डर परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:36 IST

अवैध दारू वाहतुकीला निर्बंध, तपासणी नाके वाढविणार

सावंतवाडी : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य सीमेवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून, अवैध वाहतुकीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तसेच संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी खास सीसीटीव्हीही बसविण्यात येणार असून त्याला गोवा व बेळगाव येथील अधिकाऱ्यांनी सहमती दिली आहे. निवडणूक काळात सीमेवरील पोलिस गस्त वाढण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर गोवा कर्नाटक व सिंधुदुर्ग येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बाॅर्डर परिषद पार पडली. या बाॅर्डर परिषदेला सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हृषीकेश रावले, उपजिल्हाधिकारी राहुल शेवाळे, पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, बेळगावचे पोलिस अधीक्षक एन. जगदीश, गोवा उत्पादन शुल्कचे अधीक्षक महेश कोरगावकर, सिंधुदुर्गचे परिवहन अधिकारी विजय काळे, प्रांताधिकारी हेमंत निकम, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.

या बैठकीत गोव्यातून होत असलेल्या दारू वाहतुकीवर चर्चा झाली. यात ही दारू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस व उत्पादन शुल्क यांनी गाड्याची तपासणी करावी. तसेच सीमेवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी सूचना केली. कर्नाटक राज्यातून अवैध मार्गाने जर महाराष्ट्रात काहीतरी येत असेल त्यासाठी तुम्ही तेथे तपासणी नाका ठेवण्यात यावा. तसेच गोवा कर्नाटक येथील तपासणी नाक्यावर निवडणूक कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही दारू वाहतुकीबाबत पोलिस प्रशासन कठोर निर्णय घेणार असून, सीमेवर आपली वेगळी गस्त ठेवणार आहे. या गस्ती पथकात पोलिस महसूल व उत्पादन शुल्कचे अधिकारी ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी बैठकीत सांगितले. ज्याच्यावर अवैध दारू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत, त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

सीमेवरील दारू दुकाने काही दिवस बंद राहणारमहाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक व गोवा राज्यातील सीमेवरील दारूची दुकाने मतदानाच्या आधी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. तर मतमोजणीच्या दिवशीही दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असा प्रस्ताव सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आला त्याला कर्नाटक व गोव्याच्या अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024SawantwadiसावंतवाडीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही