शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदे गटाला कोकणात धक्का, कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात पतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:32 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरच्या घडामोडींना वेग

खारेपाटण : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२२ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या कणकवली तालुक्यात रोज विविध राजकीय पक्षाकडून नेते व कार्यकर्त्यांच्या पक्षांतरच्या बातम्या सतत पुढे येत आहेत. सोमवारी (दि.२८) खारेपाटणमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या दोन युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत व जिल्हा युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.  माजी खासदार सुधीर सावंत व किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात खारेपाटण येथील युवा सेनेचे कार्यकर्ते  प्रज्योत मोहिरे व सुजय पाटणकर यांनी प्रवेश केला होता. मात्र त्यांचा पक्षप्रवेश हा काही औटघटकेचाच ठरला.खारेपाटण शिवसेना शाखा कार्यलयात शिवसेना नेते सतीश सावंत युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शैलेश भोगले व कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्योत मोहिरे व सुजय पाटणकर यांनी शिवसेना पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केला. यामुळे शिंदे गटाकडे गेलेले शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आता हळूहळू स्वगृही परत येऊ लागले आहेत. त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले.यावेळी खारेपाटण-तळेरे विभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत, युवा सेना प्रमुख तेजस राऊत, जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते अनंतराव गांधी, चंद्रकांत शेट्ये, प्रणय उपाध्ये, प्रणोती पराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे