शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

काळ आला होता.. पण वेळ नाही; ट्रकसह कार 100 फूट खोल दरीत कोसळूनही जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:36 IST

नेमका अपघात कसा झाला हे समजले नसले तरी दोन्ही वाहने १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळी कार ही ट्रकखाली चिरडली.

कणकवली  : फोंडाघाटात ट्रक आणि अल्टो कार 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. याअपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दाजीपूर खिंडीपासून फोंडयाच्या दिशेने सुमारे 3 किमी अंतरावर आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.याबाबत माहिती अशी, रंजित बाळासो भांडवले (वय 31, रा. भडगाव, ता कागल, जि. कोल्हापूर ) हे अल्टो कार क्र. ( MH-06-AN-7787) मधून प्रवास करत होते. तर ट्रकचालक मोहम्मद बापूसो मुजावर (55, रा.कागल, जि.कोल्हापूर ) हे ट्रक क्र. ( MH-41-G-5355) चालवत होते. नेमका अपघात कसा झाला हे समजले नसले तरी दोन्ही वाहने १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळी कार ही ट्रकखाली चिरडली.मात्र कार चालक रंजित भांडवले यांनी सीटबेल्ट लावल्याने ते बचावले आहेत. भांडवले हे किरकोळ जखमी आहेत. तर ट्रकचालक मोहम्मद मुजावर आणि ट्रकमधील सहप्रवासी सुभाष शिवाजी देसाई, दत्तात्रय बाबुराव देसाई ( दोघे रा. मसवे, भुदरगड जि. कोल्हापूर ) हे जखमी झाले आहेत.घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी जात दरीत उतरून सर्व अपघातग्रस्त जखमींना सुखरूप दरीतून बाहेर काढले. घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, सागर मचाळ, हायवे वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील, हवालदार अण्णा घारकर दाखल झाले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरAccidentअपघात