शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कासार्डेत अवैध सिलिका वाळू उत्खनन, कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन; उद्धवसेनेचा प्रांताधिकाऱ्यांना इशारा

By सुधीर राणे | Updated: May 15, 2025 17:02 IST

कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार

कणकवली: तालुक्यातील कासार्डे येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळू उत्खनन सुरु आहे. यावर कारवाई न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर २० मे  रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांना दिला.उद्धवसेनेच्या  शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांची आज, गुरुवारी भेट घेतली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, सतीश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, २१ एप्रिल २०२५ रोजी कासार्डे मायनिंग बाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर काहीच कारवाई न झाल्याने २ मे रोजी उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने याठिकाणी पाहणी केली. त्यावेळी लीज क्षेत्राबाहेरील जमिनीत मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचे फोटो गुगल नकाशावर देखील दिसत आहेत. त्यामुळे तातडीने ५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती करून दिली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले. मात्र, आम्ही अवैध उत्खननावर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा गंभीर विषय असताना आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून कोट्यवधींचा शासनाचा महसूल बुडविला जात असताना देखील प्रशासनाने याठिकाणी पाहणी केली नाही. त्याएेवजी कणकवली तहसीलदारांना पाहणी व चौकशी करण्याचे पत्र दिले. त्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे सोयीस्कररित्या मायनिंग माफियांना पाठीशी घातले जात असल्याचा संशय आहे. तर कर्तव्यात कसूर करून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत असल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे १९ मे पर्यंत याठिकाणी पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई न केल्यास २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर उद्धवसेनेच्यावतीने धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन