शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत गुरांची अवैध वाहतूक रोखली; बजरंग दल, भाजपा कार्यकर्ते आक्रमक

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 21, 2023 13:27 IST

कणकवली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सिंधुदुर्ग : कणकवलीहुन निपाणीच्या दिशेने बोलेरो पिकअप मधून गुरांची अवैध वाहतूक करत असताना फोंडाघाट चेक पोस्टवर पोलिसांनी अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला. ही गुरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी गुरे अडवून चौकशी केली असता तब्बल १८ गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले. दरम्यान घटनेची माहिती मिळतात फोंडाघाट चेकपोस्टवर स्थानिक ग्रामस्थांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. अखेर बोलेरोमध्ये असणाऱ्या काही तरुणांना गाड्या सह कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. फोंडा घाट चेक पोस्टवर पिकअप कार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी दिगंबर घाडीगावकर यांनी तपासणी करता अडवली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ रितेश गांधी, प्रवीण पडेलकर, निखिल तेली, नीरज नानचे, प्रथमेश लाड, विशाल रेवडेकर, शंकर पारकर, महेश सावंत, हेमराज तिरोडकर, व बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अखेर पोलिसांकडून याप्रकरणी अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीPoliceपोलिस