शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृतरित्या मासेमारी; रत्नागिरीतील तीन नौकांवर सिंधुदुर्गमध्ये कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:07 IST

तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ५५ ते ६५ खलाशी

मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवणसमोर अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे अनधिकृतरीत्या पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौकांवर सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मालवणसमोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील असलेल्या पर्ससीन नौका सफा मारवा ३ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२६२, नौका राबिया अब्दुल लतिफ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२०० व नौका जलसफा २ नों. क्र.- IND-MH-४-MM-६००५ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवणसमोर अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे अनधिकृतरीत्या पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करत असताना पकडले. या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ५५ ते ६५ खलाशी आहेत.नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्यात येणार आहे. या नौकांना लाखो रुपये दंड होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.