रोजगार हवा असल्यास नाणार गरजेचा : राजन तेली, शिवसेनेच्या भूमिकेला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:32 IST2019-02-25T16:28:42+5:302019-02-25T16:32:11+5:30
नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात आम्ही आमचा उमेदवार उतरवू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

रोजगार हवा असल्यास नाणार गरजेचा : राजन तेली, शिवसेनेच्या भूमिकेला विरोध
सावंतवाडी : नाणार प्रकल्प झाला पाहिजे यासाठी भाजप पुढाकार घेणार असून, एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे प्रकल्प नको म्हणायचे हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे नाणार प्रकल्प झालाच पाहिजे, यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, रोजगाराच्या मुद्यावर प्रसंगी लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात आम्ही आमचा उमेदवार उतरवू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, सरचिटणीस मनोज नाईक, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, अमित परब, दादू कविटकर आदी उपस्थित होते. माजी आमदार तेली म्हणाले, कोकणात नाणारसारखा एक प्रकल्प येत होता. त्यातून लाख दीड लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार होता. पण शिवसेनेच्या विरोधामुळे हा प्रकल्प जाणार आहे. पण अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प हालवण्याची घोषणा केली नाही.
लोकांची मते जाणून घेणार, असे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक नाणारवासीय तसेच मुंबईतील प्रकल्प हवा आहे, अशांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल आणि त्यांना प्रकल्प येथेच झाला पाहिजे, असेही पटवून देणार असल्याचे तेली यांनी सांगितले. नाणार प्रकल्पासाठी कंपनी जागा बघत आहे. पण सरकारने अद्यापपर्यंत या प्रकल्पाला अन्यत्र जागा बघा असे सांगितले नाही असेही तेली यांनी सांगितले.