शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

By सुधीर राणे | Updated: April 28, 2023 17:05 IST

खासदार संजय राऊत डुब्लिकेट शिवसैनिक 

कणकवली : महाविकास आघाडीलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे झाले आहे. त्यामुळेच १ मे रोजी 'मविआ'ची शेवटची सभा होणार आहे. त्यानंतर वज्रमूठ सभा होणारच नाही. खासदार संजय राऊत यांनी कोण कोणाचे ओझे झाले आहे, हे शोधण्यापेक्षा यापुढे महाविकास आघाडीचे कसे होणार यावर बोलावे. राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पातउद्धव ठाकरे यांच्याशी निगडित, त्यांच्या जवळच्या कोणी, कोणी जमिनी घेतल्या हे सांगण्याची वेळ आणल्यास सातबारा सकट यादी जाहीर करू असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार नितेश राणे म्हणाले, स्वतःला पवारांचा माणूस म्हणून घेणारे  खासदार संजय राऊत हे  बारसु प्रकरणी पवार यांच्या भूमिकेला विरोध करतात. आमच्या राहुल कुल यांनी इशारा देताच संजय राऊत यांनी इतर साखर कारखान्यांवरील चौकशीचा मुद्दा घेतलेला आहे. याचा अर्थ पवारांच्या साखर कारखान्यांची चौकशी संजय राऊत यांना हवी आहे. यातूनच हे राऊत ना उद्धव ठाकरेंचे, ना पवारांचे हे स्पष्ट झालेले आहे. हे राजकारणातील लावारिस आहेत काय ? असा सवाल सुद्धा नितेश राणेंनी केला. बारसू येथील रिफायनरीसाठी जमिनी कोणाच्या आहेत ? याची जंत्री खोलात जाऊन खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांना काढायची असेल तर त्यांनी जरूर काढावी. यापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी काही नावांची यादी जाहीर केलेली आहे. यात ठाकरेंच्या नावाची आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या कशा जमिनी आहेत हे त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे राऊत यांना आपल्या मालकाला आणखीन अडचणीत जायचे असेल तर निश्चितच त्या याद्या जाहीर कराव्यात. मग आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निगडित असणाऱ्या लोकांच्या जमिनींचे सातबारा  दाखवू.राऊत डुब्लिकेट शिवसैनिक स्वतःला कडवट शिवसैनिक म्हणणारे खासदार संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठमोठी विधाने करतात. त्यांना शिवसेनेचा स्थापना दिवस माहित नाही. त्यांना बाळासाहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. हे संजय राऊत यांना माहित नाही. यातूनच ते डुब्लिकेट शिवसैनिक आहेत. चायनीज मॉडेल आहेत हे दिसून येते. शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष दुसरा कोणत्याही नेत्यांनी आपला म्हणणे म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अपमान करणे आहे. ठाकरे किंवा संजय राऊत यांना शिवसेना बोलायचेच असेल तर त्यांनी 'उबाठा'सेना असे बोलावे. अन्यथा तो निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपमान होईल. या संदर्भात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे