शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिवसैनिकांना त्रास दिल्यास मंत्री उदय सामंतांचेही भ्रष्टाचार बाहेर काढू, विनायक राऊतांचा इशारा

By सुधीर राणे | Updated: January 2, 2023 17:54 IST

येत्या दोन ते तीन महिन्यात भाजपच स्वतःहून हे सरकार पाडणार

कणकवली: ज्यांच्या ताटात खायचे त्यांच्याच तोंडाला पाने पुसायची अशी दीपक केसरकर यांची पध्द्त आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांना तसेच नवनियुक्त सरपंचाना प्रशासन, अधिकारी यांच्या माध्यमातून त्रास दिला गेल्यास मंत्री उदय सामंत यांचाही रस्ते तसेच अन्य बाबीतील भ्रष्टाचार आम्ही कधीही बाहेर काढू शकतो. हे त्यांनी लक्षात घ्यावे. केसरकर व सामंत यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन् पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून यावे असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले. राज्यातील सध्याचे सरकार हे औटघटकेचे आहे. कारण येत्या दोन ते तीन महिन्यात भाजपच स्वतःहून हे सरकार पाडणार आहे. असा दावाही त्यांनी यावेळी केला. कणकवली तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, संदीप कदम, वैदेही गुडेकर, राजू शेट्ये, सचिन सावंत, कन्हैया पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने चांगले यश मिळवून कोकणातून पुन्हा एकदा विजयाचा झंझावात सुरू केला आहे. आगामी सर्व निवडणुकीत तो ' बांदा ते चांदा' पर्यंत निश्चितच पोहचेल. त्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसून कामाला लागावे. ग्रामपंचायत निवडणुकित आपल्या विरोधात कौरव सेना सर्व तयारी निशी उभी राहिलेली असताना सुद्धा कणकवली विधानसभा मतदार संघात आपल्या शिवसेनेला  ६८,१३० मते मिळाली आहेत. ही गरुडझेप असून आगामी  विधानसभेच्या निवडणुकीतही या मतदार संघात आपला भगवा फडकेल.वैभव नाईक म्हणाले, आता राज्यात शिवसेनेची सत्ता नसली तरी , नवनर्वाचित सरपंचांना प्रशासकीय तसेच इतर सहकार्य निश्चितच करू. लोकांनी ठरविले की ते निश्चितच भूमिका घेतात.हे या निवडणुकीत दिसून आले आहे. नवीन सरपंचांना विरोधकांकडून आश्वासने दिली जातील. पण तुम्ही शिवसेनेमुळे निवडून आला आहात. भाजप विरोधी जनतेने दिलेला तो कौल आहे. त्यामुळे शिवसेनेशी  प्रामाणिक राहायला पाहिजे.  सध्या राज्यात व देशात सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे नवनर्वाचित सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी सतर्क रहावे. यावेळी अरुण दुधवडकर, सतीश सावंत,संदेश पारकर,अतुल रावराणे,संजय पडते यांनीही मनोगत व्यक्त केले.नारायण राणेंची नार्को टेस्ट करा!शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्याचे काम नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र करीत आहेत. दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे  यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ते करीत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात आतापर्यंत झालेल्या नऊ राजकीय हत्यांची चौकशी एसआयटीतर्फे करण्यात यावी अशी आमची मागणी असून याप्रकरणी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचीही नार्को टेस्ट करावी म्हणजे नेमके सत्य जनतेसमोर येईल. असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणेDeepak Kesarkarदीपक केसरकर