शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आमदार केसरकर हक्कभंगाची धमकी देत असतील तर ती त्यांची दडपशाही - संजू परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 16:22 IST

आमदार दीपक केसरकर यांना ज्याप्रमाणे सेनेत किंमत राहीली नाही, त्याचप्रमाणे प्रशासनातही राहिली नाही.

सावंतवाडी : आंबोली कबुलायतदार हा गावाचा प्रश्न आहे. त्यामुळे तो प्रश्न सोडविण्यासाठी आमदार म्हणून तुम्हाला बोलविण्याचा संबंध येतोच कुठे? गावकरी आपला प्रश्न कोणाकडे ही मांडू शकतात. त्यामुळे केसरकर हक्कभंगाची धमकी देत असतील तर ती त्यांची दडपशाही आहे, असा सवाल भाजपा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. आम्ही मंजूर केलेल्या ठरावाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप ही परब यांनी यावेळी केला.ते आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना परब म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांना ज्याप्रमाणे सेनेत किंमत राहीली नाही, त्याचप्रमाणे प्रशासनातही राहिली नाही. कबुलायतदार गावकर प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कोकण आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आमदारांनी आपल्याला आमंत्रण दिले नसल्याचे सांगत अधिकारी आपल्याला किंमत देत नाहीत याची कबुली त्यांनी पुन्हा एकदा दिली आहे. याच रागातून संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, कोकण आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांची कोणीही भेट घेत चर्चा करू शकते. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आधी अभ्यास करावे नंतर बोलावे, असा सल्लाही परब यांनी दिला.मुळात केसरकर यांची  ताकदच राहिली नाही. विधानसभा निवडणुकीत ते थोडक्यात निवडून आले. जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही आम्हीच वरचढ ठरलो. आता तर नगरपालिका निवडणुकीत सेनेकडे सर्व जागा वर उभे करण्यासाठी उमेदवारही सापडत नाहीत अशी परिस्थिती  आहे. सेनेकडेच नाहीत तर महाविकासआघाडी तिन्ही पक्षांकडे सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांना आघाडी करून लढण्याची भाषा करावी लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.मोती तलावाच्या काठावर सेल्फी पॉइंटचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला होता. त्यामुळे तो बदलण्याचा अधिकार आमदार किंवा मुख्याधिकाऱ्यांना नाही. आता त्या ठिकाणी मापे घेतल्याची नाटकं करत त्याला आपणच मंजुरी दिल्याचे ते भासवत आहेत. बॅरिस्टर नाथ पै सभागृह भाजीमंडई याबाबतही ते लोकांची दिशाभूल करत आहेत. आगामी निवडणुकीमुळे केसरकर हतबल झाले असून खोटे बोला पण रेटून बोला त्यांची ओळख असल्याची टीकाही परब यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरPoliticsराजकारण