शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, ही माझी इच्छा - निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:38 IST

 कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढाईबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी रोखठोक भूमिका मांडली.

मुंबई -  कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर आव्हान आहे असे वाटत नाही. त्यामुळे येथून नितेश राणे 60 ते 70 हजार मतांनी विजयी होतील, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या काळात भाजपाला कोकणात एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे हे निवडून येऊ नयेत, असे मला वाटते, असेही त्यांनी सांगितले. माजी खासदार निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, कणकवली मतदारसंघातून नितेश राणे 60 ते 70 हजार मतांनी विजयी होतील. आम्ही गेल्या काही काळापासून वावरत आहोत. त्यामुळे भाजपाने आमचा पक्षप्रवेश लांबवला असे आम्हाला वाटत नाही. नारायण राणे हे भाजपाकडूनच खासदार झाले आहेत. तसे नितेश राणे यांनाही भाजपानेच उमेदवारी दिली आहे.''दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना देऊ केलेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा केली असता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना आधी निवडणून तर येऊ दे असा टोला लगावला. तसेच आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, असे मला वाटते, असे सांगितले.  विधानसभा निवडणुकीत भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा आणि युतीला मिळून 200 जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ''सध्या कोकणामध्ये भाजपाचा विस्तार करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. मात्र पक्षाला राज्यात जिथे जिथे गरज पडेल, तिथे आम्ही पक्षाला मदत करू, असेही नितेश राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीAaditya Thackerayआदित्य ठाकरेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019