सार्वजनिक स्वच्छतेची ऐशी की तैशी

By Admin | Updated: January 7, 2015 00:08 IST2015-01-06T23:00:35+5:302015-01-07T00:08:40+5:30

शहराचा मध्यवर्ती प्रभाग : तुंबलेल्या गटारी, बंद शौचालये, दूषित पाण्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न

The hygiene of the public cleanliness | सार्वजनिक स्वच्छतेची ऐशी की तैशी

सार्वजनिक स्वच्छतेची ऐशी की तैशी

कोल्हापूर : रस्त्यातूनच गटारी, शौचालये तुंबल्याने पसरलेली दुर्गंधी अशा विविध समस्यांनी कनाननगरमधील नागरिक हैराण आहेत. दूषित वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिका यंत्रणा सुस्त असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क व शाहूपुरी यांच्यामधील झोपडपट्टीच्या भागाचा कनाननगर प्रभागात समावेश होतो. झोपडपट्टीचा भाग असला तरी गल्लीमधील रस्ता हा मोठा आहे. शहराच्या इतर प्रभागांपेक्षा येथे कचरा उठाव चांगल्या प्रकारे होतो. त्याचबरोबर पाणीपुरवठा नियमित होत असल्याचे नागरिकांचे मत आहे. येथे खरी समस्या आहे ती गटारींची. गेली अनेक वर्षे गटारी न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांतूनच गटारींचे पाणी वाहते. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. झोपडपट्टीत अंतर्गत रस्त्यांची तर चाळण झालेली आहे. गल्लीतून जाताना बारकाईने पाहिल्यानंतर येथे डांबरीकरण झाले होते, याचा अंदाज येतो. इतके रस्ते खराब झालेले आहेत. कनाननगराच्या पूर्वेकडे निम्म्याहून अधिक प्रभागांतील शौचालयांचे सांडपाणी एकत्रित जमा होते. सांडपाण्याची पाईप बंद पडल्याने पाईपमधून सगळे पाणी बाहेर आले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. शेजारी राहणाऱ्यांना नाक व तोंड दाबून धरूनच घराबाहेर पडावे लागते. शौचालयाचे सांडपाणी पुढे सरकत नसल्याने सार्वजनिक शौचालये बंद झाली आहे. यामुळे लहान मुलांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. परिणामी अस्वच्छतेमध्ये अधिक भरच पडत आहे.
झोपडपट्टी परिसरापेक्षा संचार कॉलनी, घोरपडे गल्ली येथे फारशा समस्या दिसत नाहीत. प्राथमिक शाळेची व्यवस्था व दर्जा बऱ्यापैकी असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील इतर झोपडपट्ट्यांच्या तुलनेत येथे पाणीपुरवठा सुरळीत आहे. स्ट्रीट लाईट व कचरा उठाव व्यवस्थित असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले.


आमदार, खासदार करतात काय ?


नगरसेवकांवर मर्यादा
स्थानिक नगरसेवकांचा सतत संपर्क असतो; पण रस्ते व गटारींसाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध होत नसल्याने हे प्रश्न सोडविण्याकामी त्यांच्यावर मर्यादा येत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतात.

गेले चार वर्षांत दोन कोटींची कामे केली आहेत. काही भागांत गटारी व शौचालयांचा प्रश्न आहे, ते मान्य करावेच लागेल; पण ड्रेनेजचा प्रश्न सोडविण्यासाठी एक कोटीचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविलेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांसाठीही तरतूद केली असून, रस्त्यांसाठी ७५ लाख रुपये मंजूर आहेत. ट्रेड सेंटर, सासने ग्राऊंड परिसरात रस्त्यांची कामे सुरू असून, उर्वरित प्रभागातही लवकरच ती सुरू करणार आहोत. - सरस्वती दिलीप पोवार (नगरसेविका)

प्रमुख समस्या
अस्वच्छतेमुळे डासांचे साम्राज्य
ड्रेनेजची सुविधा नाही
दुषित पाणीपुरवठा
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था


विकासकामांचा दावा
शहरातील इतर झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सुरळीत पाणीपुरवठा
स्ट्रीट लाईटची सोय चांगली
स्थानिक नगरसेवकांचा नियमित संपर्क
वेळेवर कचरा उठाव .

Web Title: The hygiene of the public cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.