शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

दुचाकी अपघातात पती, पत्नी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:39 AM

कांदळगाव येथील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पती व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देदुचाकी अपघातात पती, पत्नी गंभीरकांदळगावातील घटना : जखमी रुग्णालयात दाखल्

मालवण : कांदळगाव येथील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पती व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कांदळगाव येथील नंदकिशोर राणे हे पत्नी रिया राणे, मुलगी दुर्वा, मुलगा दुर्वेश यांना घेऊन दुचाकीने कांदळगावहून मालवण येथे येत होते तर कांदळगाव येथील लवेश आयकर हा दुचाकीने कांदळगाव येथे जात होता.

अनंताश्रमलगतच्या रस्त्यावर या दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसली. यात नंदकिशोर व त्यांची पत्नी रिया रस्त्यावर फेकले गेले. यात नंदकिशोर यांच्या पायास तर पत्नी रिया यांच्या चेहऱ्यास गंभीर दुखापती झाल्या. सुदैवाने त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही.अपघाताची माहिती मिळताच तेथून येणाऱ्या कांदळगावचे माजी सरपंच रणजित परब यांनी संदीप परब, रुपेश लाड, सविता पाटकर, योगेश लाड, राकेश लाड, बाबू बागवे यांच्या मदतीने कारमधून त्यांना तत्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात झालेली नाही.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग