पत्नीस आणावयास गेलेल्या पतीला मारहाण
By Admin | Updated: June 26, 2014 00:10 IST2014-06-26T00:04:35+5:302014-06-26T00:10:36+5:30
मसुरे येथे घडली घटना

पत्नीस आणावयास गेलेल्या पतीला मारहाण
मालवण : माहेरी गेलेल्या पत्नीस आणावयास गेलेल्या देवगड येथील प्रशांत सुरेश धोंड याला विजय तांबे (रा. दहिबांव आयतनपूल) याने लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण केल्याची घटना मसुरे येथे घडली आहे.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड किल्ला येथे राहणाऱ्या प्रशांत सुरेश धोंड यांची पत्नी प्रियांका ही २३ जूनला मसुरे येथील आपल्या माहेरी आली होती. तिला परत घरी आणण्यासाठी तिचा पती प्रशांत गेला असता प्रियांका व प्रशांत यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या दहिबांव आयतनपूल येथील विजय तांबे याने प्रशांत धोंड यांना लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण केली. याबाबत धोंड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, विजय तांबे याच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल एम. एम. देसाई तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)