शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ-केळबाईवाडी येथे सापडली मानवी कवटी, हाडे; तपासणीसाठी पुण्याला पाठवणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:17 IST

कुडाळ : कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व हाडे आढळली आहेत. ती कोणाची आहेत आणि त्या ...

कुडाळ : कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व हाडे आढळली आहेत. ती कोणाची आहेत आणि त्या ठिकाणी ती कशी आली? याचा कुडाळ पोलिस तपास करीत आहेत. या ओहोळानजीक असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीमधील बेपत्ता झालेल्या रामा सावळा पवार यांचा तो मृतदेह आहे का? याचीही तपासणी केली जात आहे.कुडाळ-केळबाईवाडी येथील वामन राऊळ हे केळीची पाने आणण्यासाठी ओहोळाच्या शेजारी असलेल्या जागेत गेले असता, त्यांना तेथे मानवी कवटी व इतर हाडे दिसली. त्यांनी कातकरी समाजाचे अर्जुन पवार यांना ही माहिती दिली. या ओहोळानजीक कातकरी समाजाची वस्ती आहे. या वस्तीमधून जुलै महिन्यामध्ये रामा पवार हे बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांची बहीण सुरेखा पवार हिने कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.पोलिस घटनास्थळी झाले दाखलकुडाळ-केळबाईवाडी येथे मानवी कवटी व इतर हाडे सापडल्याचे समजताच कुडाळचे पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला, सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक कराडकर, पोलिस हवालदार देवानंद माने हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मानवी हाडांची पाहणी करून पंचनामा करून ती ताब्यात घेतली.

मानवी हाडे पाठवणार तपासणीसाठीती मानवी हाडे तपासणीसाठी सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीत हा मृतदेह पुरुष की स्त्रीचा आहे हे तसेच मृत्यू कशामुळे झाला हे समजणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस