माजगावच्या जंगलात मानवी अवशेष

By Admin | Updated: June 25, 2014 00:39 IST2014-06-25T00:32:40+5:302014-06-25T00:39:05+5:30

मृताची ओळख पटली : इन्सुलीतील नार्वेकर होते महिन्यापासून बेपत्ता

Human remains in the forest of Majagaon | माजगावच्या जंगलात मानवी अवशेष

माजगावच्या जंगलात मानवी अवशेष

सावंतवाडी : माजगाव-मळगावच्या घनदाट जंगलात आज, मंगळवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मानवी मृतदेहाचे अवशेष आढळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अवशेषांचा तपास केला असता ते इन्सुली येथील सूर्यकांत वामन नार्वेकर (वय ७५) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. नार्वेकर यांच्या नातेवाइकांनी अवशेषाशेजारी पडलेल्या कपड्यांवरून मृतदेह ओळखला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हे अवशेष डीएनएसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (पान ५ वर)याबाबत माहिती अशी की, वनविभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आज मळगाव व माजगाव जंगलात वृक्षतोड रोखण्यासाठी तपासणी करीत असताना समोरच्या जंगलात कवठी आणि हाडे असे काही अवशेष आढळून आले. त्यांनी तातडीने आपल्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित देसाई कॉन्स्टेबल मिलिंद देसाई, अमोद सरंगले आदींच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाजवळ असलेले कपडे आणि अन्य वस्तू ताब्यात घेत पंचनामा केला.
पोलिसांनी परिसरात बेपत्ता असलेल्यांच्या नोंदी शोधल्या असता इन्सुली येथील सूर्यकांत नार्वेकर बेपत्ता असल्याचे समजले. ते महिनाभरापूर्वी सावंतवाडीत नातेवाइकांकडे आले होते. त्यावेळी सलूनमध्ये जात असल्याचे सांगून ते घरातून निघून गेले होते. पोलिसांनी तत्काळ नार्वेकर यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाइकांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Human remains in the forest of Majagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.