शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 3:34 PM

कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे नाव न घेता आमदार दीपक केसरकर यांना केला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्दे कणकवलीत किती प्रकल्प सुरू आहेत? : दीपक केसरकरनीतेश राणे यांना केला सवाल; बॅगा उचलणाऱ्यांनी टीका करु नये

सावंतवाडी : कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे नाव न घेता आमदार दीपक केसरकर यांना केला ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, बाबू कुडतरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उदय भोसले, अण्णा केसरकर, हर्षवर्धन धारणकर, सावळाराम अणावकर, पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.आमदार केसरकर म्हणाले, ज्या नाट्यगृहाबाबत राणे बोलतात त्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. हे नाट्यगृह अद्ययावत आहे. पण त्याला आता २५ वर्षे झाली असून, त्याचे नव्याने नूतनीकरण करण्यात येईल. शिल्पग्रामचा पूर्ण कायापालट झाला आहे.जगन्नाथराव उद्यानात आज असंख्य मुले येतात. चोवीस तास पाण्यासाठी ४५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित योजना तयार आहे. २२ कोटी रुपयांची भूमिगत वीजवाहिनी मंजूर आहे. हेल्थफार्मचेही खासगीकरण होणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी माझ्या हृदयात आहे. त्यामुळे टिकेला उत्तर देणार नाही. येथील जनता सर्व काही जाणून आहे.ते पुढे म्हणाले, ज्या प्रमोद जठारांनी कुठल्याही नगरपालिकेमध्ये काम केले नाही, जे ३४ मतांनी निवडून आले, त्यांनी व राणेंनी माझ्या विरोधात निवडणुकीत एकत्र येऊनही तसेच गोव्यातील मंत्री बोलावूनही सावंतवाडीकरांना ते विकत घेऊ शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीतही आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे.केसरकर म्हणाले, माझ्या काळात एक तरी मायनिंग प्रकल्प येथे सुरू झाला का? याची माहिती अतुल काळसेकर यांनी घ्यावी. राजकीय व्यक्तींचे मित्र अनेक असतात, पण पैशांच्या नजरेतून सगळीकडे बघू नये. जी व्यक्ती मुंबईतून पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगा उचलते, त्याच्याबद्दल मी काय बोलणार? असेही केसरकर यांनी सांगितले.नगराध्यक्षपदासाठी आज जे उमेदवार आहेत, त्यांची गाडी जाळल्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी मला जे काय सांगितले, ते आज मी बोलणार नाही. मात्र, त्यांचा तो आपापसातील मामला आहे, असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला.महाविकास आघाडीच अधिकृत : सावंतविकास सावंत म्हणाले, आज जरी काँग्रेसचे चिन्ह मतदान यंत्रात असले तरी अधिकृत उमेदवार बाबू कुडतरकर हेच असल्याचे सांगण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आज माझ्या मुलासाठी मी स्वार्थ साधत असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. पण माझा मुलगा स्वत:चे करिअर घडविण्यासाठी सक्षम आहे. अमित सामंत यांनी याठिकाणी काँग्रेसला मत म्हणजे भाजपाला मत आहे. त्यामुळे जनतेने विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Atul Kalasekarअतुल काळसेकर