शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत :- दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 19:11 IST

सावंतवाडी : सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी ...

ठळक मुद्देपरब यांनीच सावंतवाडी टर्मिनसला विरोध केला होता

सावंतवाडी : सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी स्वीकारणार नाही. त्यांना येथील जनतेने ओळखले आहे, अशी जोरदार टीका माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली. 

मी माझ्या मंत्रिपदाचा उपयोग जमिनी लाटून पेट्रोल पंप, हॉटेल उभारण्यासाठी केला नाही, असा टोलाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी हाणला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विकास सावंत, संजय पडते, नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबू कुडतरकर, रुपेश राऊळ, वसंत केसरकर, काशिनाथ दुभाषी, पुंडलिक दळवी, बाबुराव धुरी, रवींद्र म्हापसेकर, सिध्देश परब, अमेय तेंडोलकर, उदय भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडी शहराच्या विकासासाठी येथील नागरिकांनी मला गेली अनेक वर्षे निवडून दिले. माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. परंतु आता या ठिकाणी होणाºया निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर असा संघर्ष रंगविला गेला, ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी संजू परब यांना पाहिले तर नारायण राणेच दिसतात. त्यामुळे काही झाले तरी येथील जनता त्यांना स्वीकारणार नाही. 

नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या परब यांनी यापूर्वी सावंतवाडीत टर्मिनस होऊ नये, यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे ते तब्बल पाच वर्षे प्रलंबित राहिले हे सावंतवाडीची जनता अद्याप विसरली नाही. 

परब यांनी निवडणुकीच्या आधी दोन महिने मडुरा या गावी असलेले आपले नाव सावंतवाडीच्या यादीत घातले आणि आता ते निवडणूक लढवित आहेत. मात्र, त्यांना येथील जनता स्वीकारणार नाही. कणकवलीचा दहशतवाद याठिकाणी येता कामा नये, अशी येथील नागरिकांची धारणा आहे.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माघार घ्यावी. त्यांचे पुनर्वसन आम्ही नक्कीच करू. महाआघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर आहेत. त्यांच्या पाठिशी साळगावकर यांनी रहावे. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक लागली आहे. त्यामुळे त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आजही आहेत आणि ते भविष्यातही राहतील, असे केसरकर म्हणाले. 

जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे नारायण राणे यांचे  स्वप्न अपुरे राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापन करताना आपल्याकडे १४० आमदार आहेत, असा दावा करणारे नारायण राणे नंतर मात्र मागे पडले. त्यांचे गणित कदाचित कच्चे असावे, असा टोलाही केसरकर यांनी लगावला. 

चौकट

‘त्या’ प्रवृत्तीला येथील जनता माफ करणार नाही

दीपक केसरकर पुढे म्हणाले, मी निष्क्रिय आहे, असा  राणे यांनी केलेला आरोप मला मान्य आहे. कारण मी माझ्या मंत्रिपदाचा उपयोग लोकांची बंद थिएटर्स खरेदी करण्यासाठी केला नाही. लोकांच्या जमिनी घेतल्या नाहीत की त्या ठिकाणी पेट्रोल पंप, हॉटेल व्यवसाय सुरू केला नाही. त्यामुळे राणेंच्या त्या विधानाबद्दल मला वाईट वाटत नाही. पण काही झाले तरी नारायण राणे यांच्या प्रवृत्तीला येथील जनता माफ करणार नाही. 

सावंतवाडी शहर आपल्याकडे यावे यासाठी नारायण राणे गेली २३ वर्षे हट्ट करीत आहेत. लहान मुले जसे मला चांदोबा पाहिजे, असा हट्ट धरतात, तसे राणे अनेक वर्षांपासून सावंतवाडीवर डोळा ठेवून आहेत. मात्र, येथील जनता त्यांना सावंतवाडी देणार नाही, असाही टोलाही केसरकर यांनी लगावला. 

सिंधुफोटो ०१

सावंतवाडी येथे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विकास सावंत, रुपेश राऊळ, संजय पडते, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर