होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा निकाल जाहीर

By Admin | Updated: November 22, 2014 00:11 IST2014-11-21T22:35:15+5:302014-11-22T00:11:01+5:30

ही स्पर्धा परीक्षा राज्यस्तरीय असून लेखी, प्रात्यक्षिक, मुलाखत व प्रकल्प अशा चार टप्प्यात घेण्यात आली.

Homi Bhabha declared the result of the clinical examination | होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा निकाल जाहीर

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा निकाल जाहीर

कणकवली : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ व होमी भाभा रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच सहावी व नववीकरिता घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.ही स्पर्धा परीक्षा राज्यस्तरीय असून लेखी, प्रात्यक्षिक, मुलाखत व प्रकल्प अशा चार टप्प्यात घेण्यात आली. या स्पर्धेतील लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातून ४९ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पुढील फेरीसाठी ७.५ टक्के विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गातून इयत्ता सहावीमधून २१ व नववीमधून १४ विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.
इयत्ता सहावीतील निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे- चिन्मयी प्रभूआजगावकर (७५ गुण), वैष्णवी वराडकर (६९), शार्दुल नाईक (७०), पार्थ गोसावी (६५), निनाद गावडे (६९), निखिल काळे (६२), कुणाल सावंत (६६), सर्वेश म्हाडगुत (६८), दिशा पाटोळे (६३), अ‍ॅरॉन डिसिल्वा (६३), यरीमिता टिपणीस (६९), श्वेता येनजी (६१), सुश्मिता पडते (६३), आदित्य परब (६५), आर्या तायशेटे (६८), केतकी काकतकर (६९), पल्लवी चव्हाण (६०), श्रावणी साटम (५९), चैताली चौकेकर (६६), आशय परूळेकर (६५), दिपेश चव्हाण (६३ गुण).
इयत्ता नववीतील विद्यार्थी- ओम पावसकर, अमित सावंत, दुर्वा झुल्फे, उर्जा साळगावकर, प्रतिक गायकवाड, निहाल जोग, वरूण परूळेकर, निरज वेलणकर, दिप्ती परूळेकर, जुई वालावलकर, लोचन भोगटे, भाग्यश्री प्रभू, गौरीहर काळोखे, सोमेश गावडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सहावीची प्रात्यक्षिक परीक्षा बालशिक्षण इंग्लिश स्कूल कोथरूड, पुणे येथे ४ जानेवारी २०१५ रोजी तर नववीची प्रात्यक्षिक परीक्षा ११ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे युरेका सायन्स क्लब व सुरेश कोदे फोरमच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे मार्गदर्शन तालुकास्तरावर १९ नोव्हेंबरनंतर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी ६६६.े२३ं.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन युरेका सायन्स क्लबच्यावतीने करण्यात आले
आहे. (वार्ताहर)

Web Title: Homi Bhabha declared the result of the clinical examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.