शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही महामार्ग धोकादायक वळणाचाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:55 IST

highway, road, pwd, kankavli, sindhudurgnews मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम कोट्यावधीचा खर्च होऊनही समस्या कायम

सुधीर राणे

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र , सध्या त्याउलट स्थिती पहायला मिळत आहे.सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी या कामाला मंजूर आहे . मात्र या रस्त्यावरील धोकादायक वळणे काढली गेली नाहीत . ही गंभीर बाब आहे . वळणे काढण्यासाठी काही जमीन अधिग्रहित करणे आवश्यक होती. ती अधिग्रहित करण्यात आलेली नाही. आता चौपदरीकरणाने महामार्ग वेगवान झाला तरी अनेक वळणे पूर्वीप्रमाणेच असल्याने ती धोकादायक ठरणार आहेत.काश्मीर ते कन्याकुमारी असा हा महामार्ग असून कोकणातील काम गतीने सुरू आहे. महामार्ग सुरू करायच्या आधी अनेक राजकीय नेत्यांनी महामार्ग सुसज्ज होणार असून आता महामार्गावरील वळणे राहणार नाहीत . अशा घोषणा केल्या होत्या . त्यामुळे अपघात कमी होतील असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात महामार्गाचे काम पूर्ण व्हायला आले आहे. तरी कामाची सद्यस्थिती बघितल्यास धोकादायक वळणे तशीच आहेत. काही वळणे अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागणार आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाच्यावेळी वळणे काढली जातील अशी अपेक्षा होती. मात्र, ती तशीच ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे . या महामार्गावरून आता वर्दळ वाढणार आहे . ती वळणावर जीवघेणी ठरण्याची दाट शक्यता वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.महामार्ग मृत्यूचा सापळा बनू नये !

मुंबई - गोवा महामार्ग अरुंद व वळणा वळणाचा असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असत. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण अजूनही अपघातांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. याउलट वळणाच्या महामार्गामुळे तो मृत्यूचा सापळा बनू नये. एवढीच आमची अपेक्षा आहे.-- सचिन राणे , नागरिक .

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग