शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण : जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:41 IST

Highway Sindhudurg NiteshRane- चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.

ठळक मुद्देजनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल महामार्ग चौपदरीकरण समस्यांबाबत नीतेश राणे यांचा इशारा

कणकवली : चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात जनतेच्या अडकलेल्या प्रश्नांवर गुरुवारी प्रांत कार्यालयात आमदार राणे यांनी प्रांताधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाळा जठार, सभापती दिलीप तळेकर, माजी सभापती रत्नप्रभा वळंजू, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, रूपाली भांबुरे, संकेत खानविलकर, शैलेश सुर्वे आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.सुमारे २०० प्रकरणे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रलंबित आहेत. मार्चपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढली जावीत. जेणेकरून जनतेला सातत्याने फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कणकवली प्रांताधिकारी ही प्रकरणे निकाली काढण्यास सकारात्मक प्रयत्न करीत आहेत; मात्र, त्यांना प्रशासकीय व इतर खात्यांतील अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने पाच, दहा वर्षे मोबदले अडकून असतील तर जनतेने काय करावे? आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, तरी प्रशासन स्थरावर कामे होत नसतील तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग