दोडामार्ग : काल, सोमवारी मध्यरात्री दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर चक्क चार जंगली हत्तींचा कळप दिसून आला. यावेळी या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहन धारकांचा भितीने थरकाप उडाला.गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींनी हेवाळे गावातील बांबर्डे घाटीवडे विजघर येथील शेतकरी बांधवांच्या शेतीचे नुकसान करुन धुमाकूळ घातला आहे. यानंतर या हत्तीच्या कळपाने मुख्य रस्त्याकडे मार्गक्रमण केले आहे. काल, सोमवारी मध्यरात्री हत्तीचा कळप चक्क दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर रपेट करताना दिसला.काही वाहनधारकांना हत्तीचा कळप दिसतात त्यांची घांबरगुडी उडाली. काही मिनिटे रस्त्त्यावर चालत नंतर हा कळप रस्ता सोडून बागायती दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी संदेश राणे यांनी दिली.
दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यावर जंगली हत्तींचा कळप, वाहन धारकांचा उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:15 IST