शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधी निवडुंग होतेय गावातून दुर्मीळ

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे.

बाळकृष्ण सातार्डेकर-रेडी -ग्रामीण भागामध्ये शेती बागायतीच्या कुंपणासाठी वापरला जाणारा आणि विविध आजारांवर उपयोगी असा लोकप्रिय बहुगुणी निवडुंग दुर्मीळ होत आहे. शेतीच्या रक्षणाबरोबरच वनौषधी म्हणून उपयुक्त असणाऱ्या निवडुंगाचे कृषी विभागाने जतन करून त्याची लागवड करण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे. जाड मांसल खोड त्यावर सर्वत्र काटे, विरळ पाने आणि आकर्षक फुले अशी वैशिष्ट्ये असलेले निवडुंग कोकण पट्टीतही चांगल्या प्रकारे वाढते. दलदलीची जागा सोडून शेत, माळरान, कडेकपारी जंगलातील खडकाळ जमीन अशा सर्वच ठिकाणी निवडुंगाची वाढ होते.आयुर्वेदात याचा मोठा वापर होतो. मनुष्याला शौचास साफ न होणे, खोकला, डांग्या खोकला, कावीळ, यकृताचा आजार, हृदयरोग अशा विविध रोगांवर निवडुंग या वनस्पतीच्या खोडावरची साल, डिंक व चिकापासून बनविलेलेले औषध जालीम उपायकारक आहे. हे औषध सेवन केल्यास रूग्ण तत्काळ बरा होऊ शकतो, तसेच निवडुंग हे उत्तम आयुर्वेदिक औषध म्हणूनही आजही ग्रामीण भागात विशेष परिचित आहे.आयुर्वेदात निवडुंगाला फार महत्त्व देण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील वैद्य विविध औषधात निवडुंगाचा वापर करत होते. परंतु बदलत्या काळानुसार याचा वापर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. निवडुंगाच्या झाडावरील काट्यामुळे फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर शेती बागायती आणि काही ठिकाणी घरांच्याही कुंपणाकरीता केला जातो. गावातील पडीक जमिनीतही टिकाव धरण्याच्या वैशिष्ट्यांमुळे निवडुंगाच्या कुंपणाची वर्षानुवर्षे देखभाल करावी लागत नाही. याशिवाय काटे आणि चिकट कडवट डिंक यामुळे प्राण्यांकडून याचे नुकसान होत नाही. तसेच भटके प्राणीसुद्धा निवडुंग असणाऱ्या कुंपणाच्या परिसरात फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग निवडुंगाला शेतीचा रक्षणकर्ता म्हणतो.बदलत्या काळानुसार गावागावांमध्ये दगड, चिरे आदी साहित्याचा कुंपणासाठी वापर होऊ लागल्याने पारंपरिक निवडुंग या वनस्पतीचे कुंपण विरळ झाले आहे. परंतु अशा प्रकारचीच कुंपणे सुरक्षित व अल्प दरात निर्माण होणारी असल्याचे जाणकारांचे मत असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे. पूर्वी खेड्यापाड्यातील वैद्य निवडुंगाचा मोठा वापर करत होते. आताही काही आयुर्वेदिक औषधांसह विविध औषधांसाठी याचा वापर होतो. पण आपल्याला याची अजूनही जाणीव नसल्याने याचे उत्पादन मंदावले आहे. याबाबत शेतकरी, बागायतदारांमध्ये जाणीवजागृती केली, तर नक्कीच याचे उत्पन्न वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही शेती उत्पादनाला पर्याय निर्माण होऊन शेतकरी नफ्यात येऊ शकतो. - बागायतदार प्रसाद रेडेकर