शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वादळी वाऱ्यामुळे काजू 'बी'चे नुकसान, उष्माघाताने मोहोरसुद्धा करपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:12 IST

पंचनामे करण्याची तहसिलदार, कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी

वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याने काजु पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर उष्माघाताने मोहोर सुद्धा करपून गेला आहे. या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार आणि कृषी विभागाकडे केली. तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्याने काजू पिकांचे अतोनात नुकसान केले ले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहोर तापमानवाढीने पूर्णपणे करपून गेला आहे. त्यामुळे शेतकरी पहिल्या टप्प्यातील काजूवरच संपूर्ण मदार होती. परंतु बुधवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत वादळी वारा झाला. त्यामध्ये खांबाळे, नावळे, करुळ आदी गावांमध्ये काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले.उष्माघाताने काहीअंशी सैल पडलेल्या काजूच्या कोवळ्या बी गळून पडल्या. त्यामुळे झाडांखाली कोवळ्या बी चा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय वादळी वाऱ्यामुळे आणखीनच खोलात गेला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. अनेक शेतकऱ्यांना बागेत गेल्यानंतर मोठया प्रमाणात काजू झडून पडल्याचे दिसून आले. हिरव्या पानासह काही झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या आहेत.शेतकऱ्यांनी तहसीलदारांची घेतली भेटकाजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज तहसिलदार सुर्यकांत पाटील यांची भेट घेऊन वादळीवाऱ्यांने झालेल्या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन दिवसांत पंचनामे सुरु करु : देशमुखवादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांचीही भेट घेऊन पंचनामे करण्याची अशी मागणी केली. त्यामुळे दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीweatherहवामान अंदाजFarmerशेतकरी