शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update: कोकणात पावसाचे थैमान, नद्या-नाल्यांना पूर; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 10, 2022 14:03 IST

सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहणार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : कोकणात गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काल, मंगळवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सायंकाळी उशिरा गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे.गेल्या तीन-चार दिवसापासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गगनबावाडा दरम्यान मांडुकली, किरवे, लोंघे येथे मंगळवारी सायंकाळपासून रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. तर भुईबावडा व करुळ या दोन्ही घाटमार्गात किरकोळ पडझड सुरू आहे. वैभववाडी व गगनबावडा परिसराला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.करुळ घाट वाहतुकीस बंदसोमवारी (दि.८) मुसळधार पावसामुळे करुळ घाट रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला तर मंगळवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आल्याने सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी वाहतूक आंबोली व राधानगरी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना बसला आहे. घाटमाथा व कोकण यांना जोडणारा दुवा म्हणून करूळ घाट ओळखला जातो. परंतु दोन दिवसांपूर्वी घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने संबंधित प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे.सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहणारमंगळवारी सायंकाळी सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडूकली येथे राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले. कुंभी धरणाचे पाणी सोडल्याने कुंभी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोल्हापूरहून सिंधुदुर्गात येणारी वाहने राधानगरी मार्गे येत आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणारी वाहतूक आंबोली व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम ठेवल्यास सिंधुदुर्ग–कोल्हापूर हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर