शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सह्याद्री पट्ट्यात पुन्हा दमदार पाऊस, ९५ टक्के भातपीक वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 17:54 IST

ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते.

सिंधुदुर्ग : ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू असतानाही अजूनही पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सह्याद्री पट्ट्यातील कणकवली आणि परिसरात दमदार पाऊस कोसळला आता बुधवारी सह्याद्री पट्ट्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव आदी परिसराला सायंकाळी १ तास पावसाने धुऊन काढले. त्यामुळे भातकापणी पुन्हा एकदा खोळंबली आहे.जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात न दिल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे. अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव आदी परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरूवात केली. पुढील तासभर पाऊस कोसळत होता. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीतून बचावलेली काहीशी भातशेती ताब्यात घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात होता. मात्र, गेले दोन दिवस सायंकाळच्या सत्रात कोसळणाºया पावसाने शेतक-यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकसानभरपाई अद्यापही नाहीशासनाकडून भातशेती नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, भातशेतीवर चरितार्थ असणाऱ्या येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी निसर्गाची अवकृपा झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस या ठिकाणी पडतो. यावर्षी मात्र, तो अगदी जुलै महिन्याप्रमाणे कोसळत आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी साचत असून त्यातून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकी दम येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग