शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयनीतील वाळीत कुटुंबाला अखेर न्याय

By admin | Updated: July 7, 2015 01:01 IST

अशोक जांभळेंचे प्रयत्न : भविष्यात प्रकार न घडण्यासाठी प्रयत्न

चिपळूण : खेड तालुक्यातील आयनी भोईवाडी वाळीत प्रकरणी खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांनी अखेर शनिवारी पडदा टाकला. यावेळी सरपंच संतोष कान्हेरे व प्रतिष्ठीत ग्रामस्थ उपस्थित होते. आयनी - भोईवाडी येथे प्रदीप करजवकर यांनी आपल्याला वाळीत टाकले असल्याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक जांभळे यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शनिवारी एकत्र बोलावले होते. यावेळी सरपंच संतोष कान्हेरे, उपसरपंच रत्नाकर महाकाळ, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डी. एस. महाकाळ, मुंबईचे अध्यक्ष वसंत पारधी, सचिव संतोष महाकाळ, गावचे राजेंद्र पारधी, उपाध्यक्ष राजाराम महाकाळ, रघुनाथ पारधी, राजाराम पारधी, अशोक पारधी, प्रदीप बंदरकर, सतीश सैतवडेकर, राजेश बंदरकर, आत्माराम बंदरकर, आत्माराम धुमाळ, रुपेश करजवकर, बाळकृष्ण करजवकर, अमोल करजवकर, अशोक करजवकर, शशिकांत करजवकर, सुभाष करजवकर उपस्थित होते. दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात केलेल्या शक्ती प्रदर्शनाबद्दल पोलीस निरीक्षक जांभळे यांनी खंत व्यक्त केली. जो शक्तीप्रदर्शन करतो तो चुकलेला असतो ,असे सांगून दोन तास उपस्थितांना प्रबोधन केले. त्यानंतर वाळीत टाकणे म्हणजे काय? ते कसे टाकले जाते? याबाबत त्यांनी पुरेशी माहिती दिली. भोईवाडीतील सार्वजनिक मंदिराला टाळे असल्याबाबत चर्चा झाली. समज-गैरसमज दूर होऊन मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर बंद असणे योग्य आहे, असे सांगण्यात आले. करजवकर यांच्या अंगणातून नळपाणी योजनेची पाईपलाईन गेली आहे. याबाबत सरपंच कान्हेरे यांनी चर्चा केली व समझोता केला. एकूण सर्वच तक्रारींचे निराकरण झाल्याने दोन्ही गटांचे समाधान झाले. या सगळ्या वादाला करजवकर भावकी जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भावकीतील वाद स्थानिक पातळीवर मिटवावा. गरज पडल्यास तंटामुक्त समितीकडे जा. परंतु, गावातील किंवा समाजातील लोकांनी यामध्ये हस्तक्षेप करु नये. योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा पोलीस ठाण्यात या, असे सुचविले. अंतर्गत वादामुळे गावच्या विकासाला खीळ बसली व गावचे नाहक नुकसान झाले. यामुळे गावची बदनामी झाली. त्यामुळे भविष्यात असे घडू नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून उपसरपंच महाकाळ यांनी जांभळे यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)