शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे नुकसान; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST

शेतकरी अडचणीत-पावसाचे सावट :

कडावल : कुसगाव परिसरात वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. होणाऱ्या नुकसानीची पाणी करुन याबाबत वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.  कुसगाव-धांड्याचा पाचा व खडकबाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोर व वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  विशेषत: वनगाई व सांबरांकडून होणारा उपद्रव अधिक आहे. या वन्य प्राण्यांकडून भातपिकाची अतोनात हानी होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. वन्य प्राण्यांबरोबरच मोरांकडूनही पिकाला नुकसानीची झळ बसत आहे. सूर्योदय होऊन कोवळे ऊन पडले, की मोर कळपाने शेतीमध्ये उतरतात व भाताची केसरे तोडून पीक उद्ध्वस्त करतात. येथील मनोहर आचरेकर, गजानन आचरेकर, संभाजी आईर, प्रमोद आचरेकर, गोपाळ वायंगणकर व इतर काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  तालुक्यातील कुसगाव हा सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेला अतिशय दुर्गम भाग आहे. डोंगराळ व जंगलयुक्त परिसर असल्याने येथील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागतो. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून भातपीक हे ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  वन्य प्राण्यांमुळे येथील शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. वनविभागाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)पावसाचे सावट : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी अडचणीत-दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची टांगती तलवार त्यांच्या डोईवर कायम आहे. येथील शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानटी हत्तींसह डुकरे, माकडे यासारखे वन्य प्राणी भातपीक उद्ध्वस्त करत आहेत. काही ठिकाणी मोरांकडूनही नुकसान होत असल्याची चर्चा आहे. एकंदरीत निसर्गाचा असहकार आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत बळीराजा अडकला आहे