शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

दिवाळीत आॅनलाईनला पसंती

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

ग्राहकांचा ओढा वाढला : आवश्यक वस्तू मिळताहेत माफक दरात

प्रसन्न राणे -- सावंतवाडी -दिवाळी म्हटले की नवनवीन वस्तूंची खरेदी हमखास. पण महागाईने होरपळणाऱ्या सामान्यांचा ओढा कायमच स्वस्ताईकडे असतो. त्यामुळे आपणास हवा असणारा माल स्वस्तात मिळण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू असते. यंदाच्या दिवाळीत माफक दरात आपणास हवी असणारी वस्तू मिळविण्यासाठी आॅनलाईन शॉपिंगचे जाळे शहरांबरोबरच आता गावागावांत पसरल्याचे यावेळी दिसून आले. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी आॅनलाईन शॉपिंग करण्यावर भर दिल्याने स्थानिक बाजारपेठेसह व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय यंदाच्या आॅनलाईन खरेदीत एकही तक्रार झाली नाही की कुणी हरकत घेतली नाही. तसेच कुरिअर कंपन्यांनीही याबाबत केलेल्या पाठपुराव्याने युवावर्गासह आता ज्येष्ठांचाही आॅनलाईन खरेदीला ग्रीन सिग्नल मिळत आहे.आॅनलाईन शॉपिंगचा व्यवसाय कित्येक दिवस सुरू आहे. पण सामान्यांत याबाबत विश्वासार्हता नव्हती. दर्जेदार मालाची हमी नसल्याने आॅनलाईन खरेदी म्हणजे जुगार मानला जायचा. पण हाच जुगार आता उत्कृष्ट खरेदीच्या रूपात परावर्तीत होत आहे. याचे कारण म्हणजे मालाची माफक किंमत, मालाचा किफायतशीर दर्जा आणि घरपोच केला जाणारा माल, ही मुख्य कारणे आॅनलाईन शॉपिंगच्या वृद्धीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे आॅनलाईनचे जाळे हळूहळू पसरत आहे. संबंधित कंपन्यांनी कुरिअर कंपन्यांच्या मदतीने दिलेली सेवाही यासाठी महत्त्वाची आहे. घराघरात स्मार्टफोन मोबाईल असल्याने प्रत्येजकण मोबाईलमध्ये असणाऱ्या विविध इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून जोमात शॉपिंग करताना दिसत आहे. आॅनलाईन शॉपिंगमध्ये एकाच जागी बसून हवी ती वस्तू शोधून मागविल्याने ती वस्तू ग्राहकांच्या हातात येईपर्यंत अवघे चार दिवस लागतात. वस्तू घरपोच आल्यावर पैसे द्यावे लागत असल्याने चार दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना पैशाची तडजोड करता येते.यंदाच्या दिवाळी सणाला तर काही इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून काही वस्तूंवर ६० ते ९० टक्के सूट असल्याने आॅनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची दिवाळी उत्साहात साजरी झाली. यंदाची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली तीही आॅनलाईन शॉपिंगनेच. सध्या प्रत्येक कुरिअर कंपनीकडे दिवसाला ३०० ते ४०० आॅनलाईन शॉपिंगच्या कुरिअर वस्तंूची पार्सले ग्राहकांना पोहोच करावी लागत आहेत. आॅनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्याचवेळा ग्राहक बाहेर असल्याने किंवा ग्राहकांकडे पैशाची तडजोड न झाल्याने ग्राहक वस्तू स्वीकारू शकत नाही. यावेळी त्या वस्तूचे भाडे उत्पादक कंपनीकडून घेतले जाते. उत्पादनाबद्दल काही तक्रार आल्यास आणि आलेली वस्तू परत करायची असल्यास तशी व्यवस्थाही आता अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे. आॅनलाईन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेला चांगलाच मार बसला आहे. मालाची किंमत स्वस्त करण्याचे धोरण त्यांना अवलंबण्याची गरज आहे. पण यामध्ये त्यांचा फायद्याचे वांदे होण्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहेत. एकंदरीत स्थानिक बाजारपेठेतील खरेदीसमोर आता आॅनलाईनचे संकट उभे राहिले आहे, हे मात्र नक्की.घरपोच वस्तू : सामान्य ग्राहकांमध्ये समाधानआॅनलाईन शॉपिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक वस्तू, लेडीज-जेन्टस कपडे, नेकलेस, मोबाईल, संगणक, महागड्या सर्व वस्तू, कपाटे, साड्या, सौंदर्यप्रसाधने साहित्य, विद्युत रोषणाईची माळा, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, यापेक्षा अधिक नवनवीन वस्तू आॅनलाईन शॉपिंगद्वारे मिळतात आणि या वस्तू आता ग्रामीण भागातही सहज पोहोचत आहेत. आॅनलाईनच्या या खरेदीमुळे ग्राहकांना माफक दरात हवा असणारा माल तर मिळालाच, पण तोही घरपोच आल्याने याबाबतही जनसामान्यांत समाधानाचे वातावरण आहे. आॅनलाईन खरेदीमधून सध्या दिवसाला २५० ते ३०० पेक्षा जास्त पार्सल येत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या ई-कॉम सर्व्हिसला प्रारंभ केला असून, ग्राहकांची संख्या वाढली आहे. यामध्ये युवा वर्गाचा जास्त समावेश आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्याचे काम आॅनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून करावे लागत आहे. -सुहास तुळसकर, एरिया मॅनेजर, ई-कॉम एक्स्प्रेस