शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच करा; तारकर्ली, देवबाग, भोगवे ग्रामपंचायतींची पालकमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 19:28 IST

मालवण: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड MMB ने MTDC ला पाठवलेल्या पत्रानुसार युद्धनौका गुलदार जहाज बुडवण्याचे ठिकाण निवती रॉकऐवजी कुणकेश्वर (देवगड ...

मालवण: महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड MMB ने MTDC ला पाठवलेल्या पत्रानुसार युद्धनौका गुलदार जहाज बुडवण्याचे ठिकाण निवती रॉकऐवजी कुणकेश्वर (देवगड तालुका) पेथे १७ मीटर खोलीवर बदलण्यात आले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. निवती रॉक हे मालवण आणि वेंगुर्ले या दोन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या दोन तालुक्यांच्या विकास शक्य असून गुलदार प्रकल्प निवती समुद्रातच साकारण्यात यावा, अशी मागणी तारकर्ली, देवबाग व भोगवे ग्रामपंचायतींनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉकनजीकच्या समुद्रात प्रस्तावित भारतीय नौदलाच्या निवृत्त युद्ध नौका आयएनएस गुलदारचे पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प हा महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला जागतिक दर्जा प्राप्त करून देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनानेही २०१९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली असून त्यामुळे विद्यमान स्कुबा आणि जल पर्यटन उद्योगाला बळकटी मिळणे अपेक्षित आहे. सध्याचा MMB आणि MTDC चा दृष्टिकोन हा MTDC ने तयार केलेल्या आणि केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालाशी विसंगत आहे. हा अहवाल पर्यटन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आला होता आणि त्यात निवती रॉक परिसराची निवड स्पष्टपणे नमूद आहे. कुणकेश्वर आणि १७मीटर खोलीचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला? यासाठी वैज्ञानिक अभ्यास सरकारच्या कोणत्या संस्थेने केला आहे का? यासाठी परवानगी घेतली आहे का? जर नसेल, तर हा बदल अहवाल आणि पर्यटन मंत्रालयाशी केलेल्या कराराचा भंग ठरत नाही का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. हा प्रकल्प भारतातील पहिलाच प्रयोग आहे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असा टप्पा गाठण्याची संधी आहे. परंतु सध्याच्या नियोजनामुळे आणि कुणकेश्वर येवील अयोग्य ठिकाणामुळे हा प्रकल्प अयशस्वी होण्याची भीती आहे. तरी, निवती रॉक येथे हा प्रकल्प राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच, प्रकल्पाची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वै ज्ञानिक पद्धतीने होईल आणि केंद्र सरकारच्या अहवालाशी सुसंगत राहील, याची खात्री करावी, अशीही मागणी करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनguardian ministerपालक मंत्रीNitesh Raneनीतेश राणे