पालकमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:47 PM2020-10-19T12:47:25+5:302020-10-19T12:55:02+5:30

navratri, sindhudurg, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सोमवारी सकाळीच कणकवली तालुक्यातील खारेपाटण  गावी तातडीची भेट दिली. परतीच्या पावसाने येथील शेतकरी बांधवांच्या नुकसान झालेल्या भात शेतीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत आशा सक्त सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नाम उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला यावेळी केल्या.

Guardian Minister Uday Samant interacted with the farmers | पालकमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

पालकमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

Next
ठळक मुद्देपालकमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद खारेपाटणला भेट, भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सोमवारी सकाळीच कणकवली तालुक्यातील खारेपाटण  गावी तातडीची भेट दिली. परतीच्या पावसाने येथील शेतकरी बांधवांच्या नुकसान झालेल्या भात शेतीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत आशा सक्त सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नाम उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला यावेळी केल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने येथील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी पूर आल्यामुळे भातशेतीचे अधिकच नुकसान झाले आहे.यामध्ये काही शेतकऱ्यांचे भात हे पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काहिचे भात पावसाच्या पाण्याने कुजून गेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटण येथील "भाटले" व "बिगे" येथील भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते संदेश पारकर,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख  संजय पडते, कणकवली तहसीलदार  रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, राजू शेट्ये, शैलेश भिजले, खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर,शरद वायंगणकर,वैभव मलांडकर,खारेपाटण शाखा प्रमुख  शिवाजी राऊत,कृषी विभागीय अधिकारी  एस एस हजारे आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करताना ज्या काही त्रुटी अधिकाऱ्यांना येत आहेत, त्या दुर करण्याच्या सूचना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित राहून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या मालकीचे शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत आपण कृषी मंत्री ,महसूल मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकरी बांधवाना देखील नुकसान भरपाई मिळण्यासठी प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱयांना त्यांच्या भात शेतीची झालेल्या नुकसानीची भरपाई ही योग्य वेळी दिली जाईल असे देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगत असल्याचे देखील पालकमंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितले.


"टिकेल उत्तर देण्यापेक्षा शेतकर्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांची दुःख जाणून घेऊन त्यांना मदत करणे हे आपले काम आहे." खासदार नारायण राणे यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने मंजुरी मिळालेल्या मेडिकल कॉलेजला परवानगी देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे म्हटले होते .यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर जास्त न बोलता यावर्षीच मेडील प्रवेश या कॉलेजमध्ये यावेळी होतील असे सांगितले.

 सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून सरकार व पालकमंत्री जनतेची दिशाभूल करत आहे या राणेंच्या टिकेला उत्तर देताना देखील पालकमंत्री यांनी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज,लॅब,ऑक्सिजन प्लांट,मंगेश पाडगावकर स्मारक,मचीन्द्र कांबळी स्मारकला गती दिली, आंगणेवाडी नळपाणी योजना केली ही सर्व कामे राज्य शासनाने केल्याचे आवर्जून सांगितले. तसेच राणे यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. ते त्यांचे काम करू दे आम्ही आमचे विकासाचे काम करत राहू. असे देखील पालकमंत्री यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दरम्यान आज पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटण येथे शेताच्या बांधवरच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.यावेळी मंदिरात बसून कागदी पंचनामे करणाऱ्या महसुली व कृषी कर्मचारी यांच्यावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्ती केली. तर अधिकाऱ्यांनी जबाबदारीने प्रत्यक्ष शेतावर जाऊनच पंचनामे करावेत. यामध्ये काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचऱ्यावर कडक कारवाही करण्यात येईल.अशा सक्त सूचना देखील वरीष्ट अधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या."

 खारेपाटण येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते,खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत.
 

Web Title: Guardian Minister Uday Samant interacted with the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.