शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:57 PM

बांदा : माकडतापाने सलग दुसºया वर्षी बांदा परिसरात थैमान घातले असून परिसरात माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसºयावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. माकडतापाच्या साथीने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, ...

बांदा : माकडतापाने सलग दुसºया वर्षी बांदा परिसरात थैमान घातले असून परिसरात माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसºयावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. माकडतापाच्या साथीने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कामाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.माकडताप बाधित क्षेत्रातील गावांमध्ये २४ तास वनखात्याने पथके कार्यरत ठेवावीत. आरोग्य विभागानेही प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार करुन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या. यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बांदा आरोग्यकेंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा विकास रखडला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला येथील प्रमुख अधिकारी बदलावे लागतील असे सूचक वक्तव्यही पालकमंत्री केसरकर यांनी केले.माकडतापाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. तसेच अधिकाºयांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. यावेळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, दोडामार्ग तहसीलदार रोहिणी राजपूत, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, दोडामार्ग शिवसेना तालुुकाप्रमुख बाबुराव धुरी, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुशांत पांगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदींसह वनविभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी माकडतापाची साथ व रुग्णांना देण्यात येणाºया सुविधा यांचा सविस्तर आढावा जाणून घेतला. माकडतापबाधित डोंगरपाल गाव हा काजू बागायतीने समृद्ध असून येथील ९0 टक्के लोक हे काजू बागायतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याठिकाणी कार्यरत रहावे. तसेच जास्तीत जास्त शेतकºयांना डीएमपी आॅईलचे वाटप करा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. औषधांची कमतरता असल्यास तातडीने आपल्याशी संपर्क साधा. पशुधन विभागाला सोबत घेऊन गावात प्रत्येक दोन दिवसाआड डस्टिंग करा, असेही ते म्हणाले.बांदा आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे मी वेळ देत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. या इमारतीला जिल्हा परिषदेने निधी दिला. त्याहूनही अधिकचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे. इमारत उद्घाटनाची वाट न बघता येथे येणाºया रुग्णांना नवीन इमारतीत उपचार देण्यास सुरुवात करा, असे आदेश केसरकर यांनी डॉ. जगदीश पाटील यांना दिले.यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांना धारेवर धरत ‘तुम्ही आपली जबाबदारी ग्रामपंचायतीवर का ढकलता?’ असा सवाल केला. मृत माकडांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही पूर्णपणे तुमची आहे. साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून यामध्ये कामचुकारपणा करणाºया अधिकाºयांना कारवाईसाठी सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा दिला. यावेळी पशुधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित वनविभाग व पशुधन विभागाबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर यांनी दोन्ही विभागांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले.जिल्ह्यातील अधिकाºयांची बदली करणार : दीपक केसरकरबांदा परिसरात माकडतापासारखी गंभीर परिस्थिती असताना जिल्ह्यातील आरोग्य, वनविभाग आणि संबंधित कोणत्याच विभागाचा मुख्य अधिकारी त्या गावापर्यंत पोहोचला नसल्याने पालकमंत्री केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्याबाबत आत्मीयता असली पाहिजे. सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य अधिकारी चांगले असणे गरजेचे आहे. मात्र या अधिकाºयांना त्याची फिकीर नसल्याने लवकरच वरिष्ठ अधिकाºयांची बदली करून त्याजागी चांगले अधिकारी बसविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.