शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांनाही अनुदान द्याव

By admin | Updated: January 2, 2015 00:22 IST

वैभव नाईक : शिक्षणमंत्र्यांकडे मागणी करण्याचे आश्वासने

कणकवली : सध्याच्या युगात इंग्रजी शिक्षणालाही महत्त्व आहे. त्यामुळे आता मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी आपण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच प्रयत्न करेन, असे सांगतानाच आयडियल स्कूलच्या मदतीसाठी नेहमी पुढे असेन, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी  दिले.वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश माध्यम स्कूलच्या दशकपूर्ती आयडियल शिशुवर्गाच्या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय वळंजू, रोटरीचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, पंचायत समिती सदस्या भाग्यलक्ष्मी साटम, चेअरमन डॉ. विद्याधर तायशेटे, बुलंद पटेल, प्रा. हरिभाऊ भिसे, निलेश महेंद्रकर, मोहन सावंत, डी. पी. तानवडे, शीतल सावंत, भूषण परुळेकर, प्राचार्या गीतांजली कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी विजय वळंजू यांनी सांगितले की, आॅस्ट्रेलियासारख्या देशात भारतीय शिक्षणाला प्राधान्य देतात. आज पालकांनीही अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ पदवीसाठी मुलांना शिक्षण न देता पालकांनी जगातील घडामोडींचा अभ्यास करून पाल्यांना दिशा देण्यासाठी प्रयत्न करावेत. दीपक बेलवलकर म्हणाले, याठिकाणी येऊन आज लहानपणीची आठवण येत आहे. आम्हीदेखील कधीतरी गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला त्या आठवणी ताज्या झाल्या.कार्यक्रमानंतर आयडियल स्कूलच्या कणकवली व वरवडे येथील नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या मुलांचा कार्यक्रम व बक्षीस समारंभ झाला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. नीलेश महेंद्रकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दहा लाखांचा निधी मंजूरया प्रशालेच्या इमारतीच्या उद्घाटनाला मी उपस्थित होतो. त्यावेळी ३० ते ४० विद्यार्थी असलेल्या या शाळेत आज ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. छोटे रोपटे आज मोठे झाले आहे. आयडियल स्कूलच्या सुरेश कोदे सायन्स प्रयोगशाळेसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही असे प्रयत्न करण्यात येतील.