शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत निघाली भव्य 'आरक्षण बचाव' रॅली; काँग्रेस, राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

By सुधीर राणे | Updated: October 5, 2024 16:09 IST

नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसह महायुती व आरपीआयचे कार्यकर्ते, आरक्षित समाज बांधव एकवटले

कणकवली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यावर देशातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज, शनिवारी कणकवली शहरातून भाजपसह महायुती व आरपीआय तसेच आरक्षित समाजाने भव्य रॅली काढली. यावेळी आरक्षण वाचविण्याचा नारा देण्यात आला. भर उन्हात या रॅलीत महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजीमुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत या रॅलीला जानवली नदीवरील पुलाजवळून  प्रारंभ झाला. त्यानंतर  कणकवली बुद्धविहार येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', 'भारतीय संविधानाचा विजय असो', 'आरक्षण हटवू पाहणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली पोहचल्यावर त्या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. आमदार नितेश राणे तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. या सभेनंतर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.पोलिसांचा कडक बंदोबस्त!या रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गreservationआरक्षणNitesh Raneनीतेश राणे Mahayutiमहायुती