कुडाळ : शिवापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीतील सुमारे १० लाख २८ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तत्कालीन ग्रामसेवक सुदाम चौरे (मूळ रा. नंदुरबार) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.शिवापूर ग्रामपंचायतीमध्ये २०१६ साली चौरे हे ग्रामसेवकपदी कार्यरत होते. या दरम्यान ३ ते २१ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत चौरे यांनी ग्रामविकास निधी, पाणीपुरवठा निधी, १४ वा वित्त आयोगाचा निधी यात स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून खोट्या सह्या करून सुमारे १० लाख २८ हजार ६०० रुपयांच्या निधीची अफरातफर केली होती.याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनास समजताच ७ सप्टेंबर २०१७ रोजी चौरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल असल्यापासून काही काळ ते निलंबित होते. सध्या ते तारकर्ली ग्रामसेवकपदी कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी उशिरा कुडाळ पोलिसांनी तारकर्ली येथे जात चौरे यांना अटक केली.
अपहारप्रकरणी ग्रामसेवकाला चार दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:29 IST
शिवापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीतील सुमारे १० लाख २८ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तत्कालीन ग्रामसेवक सुदाम चौरे (मूळ रा. नंदुरबार) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
अपहारप्रकरणी ग्रामसेवकाला चार दिवसांची पोलीस कोठडी
ठळक मुद्देअपहारप्रकरणी ग्रामसेवकाला चार दिवसांची पोलीस कोठडीचौरे यांच्यावर गुन्हा दाखल