शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 2:17 PM

GramPanchyat Elecation Sindhudurgnews - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामाला प्रारंभवर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असतो. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू झाले असून, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात रणसंग्राम रंगणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरू शकते . ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतरच खऱ्या अर्थाने रणसंग्राम सुरू झाला आहे . सिंधुदुर्गातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.

मात्र, स्थानिक स्तरावर अशी आघाडी होऊ शकेल का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक स्तरावर प्रथमच अशी आघाडी होऊन निवडणूक लढविली जाणार असल्याने ही महाविकास आघाडीसाठी एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरणार आहे. ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असते, त्यांना जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका थोडया सोप्या होतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रत्येक पक्ष जातीने लक्ष घालत असतो. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.भाजपाला रोखण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, सतीश सावंत, संदेश पारकर, अमित सामंत, बाळा गावडे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे इतर नेते व पदाधिकारी कोणती रणनीती आखतात हे निवडणूक निकालानंतरच समजू शकणार आहे.नारायण राणेंना विशेष प्रयत्न करावे लागणार !नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, ते भाजपवासी झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपनंतर शिवसेना आणि इतर पक्षांचे वर्चस्व ग्रामपंचायतींवर आहे. महाआघाडी झाली तर नारायण राणे यांना पूर्वीप्रमाणेच आपले निर्विवाद वर्चस्व ग्रामपंचायतींवर कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग